शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

घरकु ल लाभार्थींची देयकासाठी अडवणूक

By admin | Updated: June 6, 2014 22:37 IST

पैसे न देेण्यार्‍यांचे दडपले जातात प्रस्ताव

सायखेड : बार्शीटाकळी पंचायत समितीमध्ये घरकुल अनुदानाच्या देयकासाठी संबंधित विभागाच्या कर्मचार्‍यांकडून लाभार्थींची अडवणूक होत असून, पैसे न दिल्यास घरकुल प्रस्तावही दडपले जात असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू असल्याचे दिसत आहे.
घरकुल लाभार्थींनी आवश्यक बाबींची पूर्तता केल्यानंतर त्यांना त्वरित अनुदान मिळण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून उपाययोजना केल्या जातात; परंतु बार्शीटाकळी पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांचे त्यांच्याच प्रशासकीय यंत्रणेवर नियंत्रण नसल्यामुळे लाभार्थींना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अनुदानाचा दुसरा व तिसरा हप्ता मिळण्यासाठी बांधकामाच्या छायाचित्रासह प्रस्ताव आवक-जावक विभागात दिले जातात. सदर प्रस्ताव बांधकाम विभागात पाठविल्यानंतर जे लाभार्थी गैरमार्गाने पैसे देतील, त्यांचेच प्रस्ताव पुढील प्रक्रियेसाठी पाठविले जातात. ज्यांनी पैसे दिले नाहीत, त्यांची कागदपत्रे कार्यालयात धूळ खात पडतात. कधी घरकुलाचे छायाचित्र बरोबर नाही, तर कधी शौचालय नियमानुसार बांधले नाही, अशी कारणे सांगून घरकुल प्रस्ताव त्रुटीत पाठविले जातात. तालुक्यातील लाभार्थी दररोज पंचायत समिती कार्यालयात येरझारा घालतात; परंतु त्यांना कधी गटविकास अधिकारी नाहीत, तर कधी शाखा अभियंता नाहीत, अशी कारणे सांगितली जातात. चोहोगाव येथील काशीनाथ बिंबाजी इंगळे व बाळू सुखनंदन इंगळे, सायखेड येथील अरुण आनंदा तायडे यांनी घरकुलाच्या अंतिम देयकासाठी पं.स.मध्ये गेल्या २० ते २५ दिवसांपासून प्रस्ताव सादर केला. त्यांचे प्रस्तावावर गटविकास अधिकार्‍यांची स्वाक्षरी झाल्यानंतरीही सदर प्रस्ताव दोन दिवस दडपून ठेवण्यात आले. विशेष म्हणजे यापैकी एकाने स्लॅबचे, तर दुसर्‍याने दुमजली घरकुल बांधले आहे.
या प्रकाराकडे गटविकास अधिकार्‍यांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे लाभार्थींना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वरिष्ठांनी लक्ष कंे द्रित करून या प्रकाराला प्रतिबंध घालावा, अशी लाभार्थींची मागणी आहे.