शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
2
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
3
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
4
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
5
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
6
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
7
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
8
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
9
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
10
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
11
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
12
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
13
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
14
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
15
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
16
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
17
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
18
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
19
धार भोजशाळा 'सरस्वती मंदिर'च! HC कडून हिंदूंना पूजेचा अधिकार, नमाजचा आदेश रद्द; आली मुस्लीम पक्षाची पहिली प्रतिक्रिया
20
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
Daily Top 2Weekly Top 5

धनादेश अनादरप्रकरणी कारावासाची शिक्षा

By admin | Updated: May 8, 2014 00:54 IST

धनादेश अनादरप्रकरणी न्यायालयाने बुधवारी आरोपीस ३ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली.

अकोला: धनादेश अनादरप्रकरणी न्यायाधीश हुसैन यांच्या न्यायालयाने बुधवारी आरोपीस ३ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली.
 गीतानगरात राहणारे राजेश दुबे (४५) यांनी गीतानगरातील गुरुश्रीचंद पार्कमध्ये दोन दुकाने खरेदी करण्याचा व्यवहार सुशील राजारामसिंह ठाकूर याच्यासोबत केला होता. त्यासाठी त्यांनी सुशील ठाकूर याला ३.८0 लाख रुपये दिले. दरम्यान, राजेश दुबे यांनी व्यवहार केलेली दोन्ही दुकाने बँकेकडे गहाण ठेवलेली असल्याचे माहीत झाल्यावर त्यांनी  सुशील ठाकूर याला बँकेकडे गहाण असलेली दुकाने सोडवून घेण्यास सांगितले; परंतु त्याने ही दुकाने बँकेकडून सोडून घेतली नाही. राजेश दुबे यांनी त्याला पैसे परत देण्याची मागणी केली. आरोपी सुशील ठाकूर याने दुबे यांना ३.८0 लाख रुपयांचा धनादेश दिला; परंतु हा धनादेश बँकेत अनादरित झाला. त्यामुळे दुबे यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली. बुधवारी न्यायाधीश हुसैन यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान आरोपी सुशील ठाकूर हा दोषी आढळून आल्याने न्यायालयाने त्याला ३ महिन्यांचा कारावास व धनादेशाची थकीत रक्कम व नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला. तक्रारकर्त्याकडून अँड. एम. बदर यांनी काम पाहिले.