वाळूची अवैध वाहतूक; दोन ट्रक पकडले, २.४८ लाख रुपयांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 13:50 IST2019-06-23T13:50:33+5:302019-06-23T13:50:39+5:30
वाळूची अवैध वाहतूक करताना आढळून आलेले दोन्ही ट्रक मालकांना २ लाख ४८ हजार रुपयांचा दंड आकारण्याची कारवाई जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दोड यांनी केली.

वाळूची अवैध वाहतूक; दोन ट्रक पकडले, २.४८ लाख रुपयांचा दंड
अकोला : वाळूची अवैध वाहतूक करताना आढळून आलेले दोन ट्रक रिधोरा बायपास येथे पकडून दोन्ही ट्रक मालकांना २ लाख ४८ हजार रुपयांचा दंड आकारण्याची कारवाई जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दोड यांनी शुक्रवारी दुपारी ४.३० वाजता केली.
जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात जिल्हास्तरीय आकस्मिक धाड तपासणी पथक गस्तीवर असताना, अकोला तालुक्यातील रिधोरा बायपास येथे एमएच २८ एच ६०७६ आणि एमएच २८ एबी ७९३५ या क्रमांकाचे दोन ट्रक वाळूची अवैध वाहतूक करताना आढळले. दोन्ही ट्रक जप्त करून जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आले. दोन्ही ट्रक मालकांना २ लाख ४८ हजार रुपये दंड आकारण्याची कारवाई जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दोड यांनी केली असून, दंडाची रक्कम वसूल करण्याची कारवाई अकोला तहसीलदारांकडून करण्यात येणार आहे.