अवैध विक्री; जुने शहर पोलिसांनी केले १३ सिलींडर जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 14:15 IST2019-02-03T14:14:21+5:302019-02-03T14:15:00+5:30
अकोला: जुने शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गाडगे नगरातील एका घरातुन गॅस सिलींडरची अवैध विक्री सुरु असल्याच्या माहितीवरुन जुने शहर पोलिसांनी छापा टाकून १३ गॅस सिलींडर जप्त केले.

अवैध विक्री; जुने शहर पोलिसांनी केले १३ सिलींडर जप्त
अकोला: जुने शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गाडगे नगरातील एका घरातुन गॅस सिलींडरची अवैध विक्री सुरु असल्याच्या माहितीवरुन जुने शहर पोलिसांनी छापा टाकून १३ गॅस सिलींडर जप्त केले. रविवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली असून आत्माराम इंगळे नामक इसमास ताब्यात घेण्यात आले आहे.
गाडगे नगरामध्ये आत्माराम इंगळे हे गॅस सिलींडरचा अवैधरीत्या साठा करून त्याची चढया दराने विक्री करीत असल्याची माहिती जुने शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी गाडगे नगरातील इंगळे याच्या घरात छापा टाकला. या ठिकाणावरुन गॅस सिलींडरचा साठा जप्त करण्यात आला आहे. २८ हजार रुपये कीमतीचे १३ सिलींडर पोलिसांनी जप्त केले असून जिवनावश्यक वस्तू अधिनीयम कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी आत्मारात इंगळे याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जुने शहरचे प्रभारी ठाणेदार सुनील सोळुंके, साहायक पोलीस निरीक्षक महादेवराव भारसाकळे, पोलीस उपनिरीक्षक दिलीप पोटभरे, महेंद्र बहादुकर, सदाशिव सुडकर, अनीस पठान, धनराज बायस्कर, नितीन मगर व निलेश पायघन यांनी केली. शनिवारी सिटी कोतवाली पोलिसांनीही घरगुती गॅस सिलींडरचा व्यावसायीक वापर करणाऱ्या चार जनांवर कारवाई केली होती.