शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात चालतात बेकायदेशीर वीटभट्टय़ा

By admin | Updated: February 28, 2015 02:24 IST

पश्‍चिम व-हाडात १२ भट्टय़ा अधिकृत; महसूल विभागाकडून केवळ माती उत्खननाला परवानगी.

सिद्धार्थ आराख/ बुलडाणा: केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ वने व पर्यावरण मंत्रालयाची अधिकृत परवानगी नसलेल्या सुमारे ७५ हजार वीटभट्टया राज्यभरात अनाधिकृतरीत्या सुरू असल्याची खळबळजनक माहिती हाती आली आहे. विनापरवाना सुरू असलेल्या या वीटभट्टय़ांमुळे शासनाचा दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. बुलडाणा जिल्ह्यात नांदुरा आणि मलकापूर येथे दोन तर अकोला आणि वाशिम जिल्ह्यात जेमतेम ५ ते १0 वीटभट्टय़ा अधिकृत आहेत. राज्यात बोटावर मोजण्या इतक्याच अधिकृत वीटभट्टय़ा वगळल्यास सुमारे ७५ हजाराहून अधिक वीटभट्टय़ा या अनधिकृत आहेत. वीटभट्टी पजावाकरिता केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, वने व पर्यावरण मंत्रालयाची अधिकृत परवानगी लागते. ही परवानगी केवळ स्थिर धुरांडे (चिमणी) असलेल्या वीटभट्टय़ांनाच दिली जाते. ही परवानगी घेताना अत्यंत किचकट अशा नियम व अटींचे पालन करावे लागते. विशेषत: स्थिर भट्टय़ांनाच ही परवानगी मिळते; मात्र बोटावर मोजण्या इतक्या वीटभट्टय़ा वगळल्यास राज्यभरात सुरू असलेल्या वीटभट्टय़ा या गावठी व सरकत्या धुरांड्याच्या आणि ठराविक कालावधीमध्ये चालणार्‍या असतात. त्यामुळे त्यांना परवानगी मिळत नाही. तरीही या वीटभट्टय़ा अनधिकृतपणे बिनदिक्कत सुरू आहेत.अकोला येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी राहुल मोटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ज्या वीटभट्टय़ांना केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची अधिकृत परवानगी असते त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम मंडळाचे असल्याचे सांगीतले; मात्र ज्यांनी परवानगी घेतली नाही. त्या सर्व वीटभट्टय़ा या महसूल विभागाच्या अखत्यारीत येतात. त्यांच्याविरूद्ध कारवाईसुद्धा ते करू शकत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. *माती उत्खननाची परवानगी देताना नियमानुसार प्रशासन त्यांच्याकडून रॉयल्टी भरून घेते. तेवढाच महसूल शासनाच्या तिजोरीत जमा होतो; मात्र या मातीचा उपयोग वीटभट्टीसाठी होतो, हे प्रशासनाला माहिती असतानाही त्यांच्याकडून वीटभट्टीचा कर वसूल करू शकत नाही. तथापि, आर्थिक वर्षाअखेर प्रशासन याच वीटभट्टय़ांना बाजारभावापेक्षा ति प्पट दंड आकारून शासनाच्या महसुलामध्ये भर टाकण्याचे काम करते. मागील वर्षी एक हजार प्रकरणामध्ये ६0 लाख रुपये दंड आकारण्यात आला होता. तर एकट्या बाळापूर तालुक्यात १ कोटी रूपयाचा दंड आकारण्यात आल्याची माहिती आहे.*असे आहेत परवानगीचे नियमकेंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाने २२ जुलै २00९ रोजी एक अधिसूचना प्रसारीत केली आहे. यामध्ये केंद्रीय पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ च्या कलम ६ आणि २५ नुसार प्रदान केलेल्या अधिकारान्वये वीटभट्टय़ांना परवानगी देताना काही पॅरामिटर आणि मानक ठरवून दिलेले आहेत. त्यानुसार वीटभट्टीला स्थिर धुरांडे (चिमणी) सक् तीचे करण्यात आले आहेत. या चिमणीची उंची वीटभट्टीला लागणारी माती, त्यासाठी लागणारे पाणी, ज्या ठिकाणाहून माती आणल्या जाते त्याची स्वतंत्र नियमावलीसह लघू, मध्यम आणि मोठय़ा भट्टय़ांचे वेगवेगळे नियम ठरवून दिले आहेत.