शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

ताप न आल्यास विश्वास बसेना; लस खरी की खोटी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2021 11:01 AM

Corona Vaccine : कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण परिणामकारक असल्याचे वैद्यकीय अधिकारी सांगतात.

ठळक मुद्देनागरिकांमध्ये संभ्रम तज्ज्ञांच्या मते लस परिणामकारक

- प्रविण खेते

अकोला : कोविड प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतर अनेकांना ताप किंवा इतर लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळे घेतलेल्या लसीचा परिणाम होत नसल्याने अनेकजण साशंक दिसून येतात. लस खरी की खोटी, असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होतो. मात्र, कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण परिणामकारक असल्याचे वैद्यकीय अधिकारी सांगतात. कोविड विरुद्धच्या लढाईत लस महत्त्वाचे शस्त्र ठरत आहे. जिल्ह्यात सद्य:स्थितीत कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसी दिल्या जात आहेत. ज्यांनी कोविशिल्ड घेतली, अशा बहुतांश लोकांना लसीकरणानंतर ताप येणे, हातपाय दुखणे यासारखी लक्षणे दिसून आली. तुलनेने काेव्हॅक्सिन घेणाऱ्यांना कमी त्रास झाल्याचे दिसून आले. त्यामुळे ताप न आल्यास घेतलेली लस परिणामकारक आहे की नाही, असा प्रश्न अनेकांना पडतो. नागरिकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम हा निराधार असून, दोन्ही लसी परिणामकारक असल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांचे आहे. जिल्ह्यात दिल्या जाणाऱ्या दोन्ही लसी परिणामकारक असून, पूर्णत: सुरक्षितदेखील आहेत. त्यामुळे नागरिकांनी वेळेतच लसीचे दोन्ही डोस घ्यावे, असे आवाहनदेखील आरोग्य विभागामार्फत केले जात आहे.

आतापर्यंत झालेले लसीकरण

पहिला डोस - ५,२०,०३६

दोन्ही डोस - २,१४,९२१

कोव्हॅक्सिन - ५,४४,६२०

कोविशिल्ड - १,२०,६८०

कोविशिल्डचा त्रास अधिक

जिल्ह्यात सद्य:स्थितीत कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसी नागरिकांना दिल्या जात आहेत. ज्यांनी कोविशिल्ड लस घेतली, त्यांना कोव्हॅक्सिनच्या तुलनेत जास्त त्रास होत असल्याचे दिसून येत आहे. कोविशिल्ड लस घेतल्यानंतर बहुतांश लोकांना ताप येऊन गेल्याचे दिसून आले. या तुलनेत कोव्हॅक्सिन घेणाऱ्या क्वचितच लोकांना त्रास झाल्याचे दिसून आले.

 

लसीनंतर काहीच झाले नाही....

मी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला, मात्र मला कुठलाच त्रास झाला नाही. लस घेतल्यानंतर ताप येईल, अंगदुखीचा त्रास होईल, अशी भीती लस घेण्यापूर्वी होती. मात्र, प्रत्यक्षात तसे काहीच झाले नाही. लसीकरण पूर्णत: सुरक्षित आहे. मी लस घेतली, तुम्हीही घ्या.

- महेश पाटील, नागरिक

माझे लसीकरण झाले आहे. लस घेतल्यानंतर कुठलाही त्रास झाला नाही. थोडी कणकण जाणवली, मात्र काही तासांतच बरे वाटायला लागले. त्यामुळे लसीकरणाविषयीची मनातील भीती नाहीशी झाली. तुम्हीदेखील लस घेऊन कोरोनापासून स्वत:चे रक्षण करा.

- हेमंत देशमुख, नागरिक

 

त्रास झाला तरच परिणामकारक असे अजिबात नाही

प्रत्येकाच्या शरीराची परिणामकारकता वेगवेगळी असते. त्यामुळे लस घेतल्यानंतर कोणाला ताप येऊ शकतो, तर कोणाला नाही. याचा अर्थ लसीकरणानंतर त्रास झाला तरच लस परिणामकारक आहे, असे अजिबात नाही. दोन्ही लसी परिणामकारक असून, सुरक्षित आहेत. त्यामुळे नागरिकांनी संभ्रमात न राहता मिळेल ती लस घेऊन कोविडपासून स्वत:चे व आपल्या कुटुंबीयांचे रक्षण करावे.

- डॉ. वंदना वसो (पटोकार) , जिल्हा शल्य चिकित्सक, अकाेला

टॅग्स :AkolaअकोलाCorona vaccineकोरोनाची लस