शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
2
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
3
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
4
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
5
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
6
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
9
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
10
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
11
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
12
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
19
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
20
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कर्मचार्‍यांना ओळखपत्र बंधनकारक

By admin | Updated: May 11, 2014 18:37 IST

अधिकारी-कर्मचार्‍यांची सहज ओळख व्हावी, या उद्देशाने सर्वांना ओळखपत्र बंधनकारक केले

अकोला- शासकीय कार्यालयामध्ये येणार्‍या नागरिकांना त्यांचे काम असलेल्या अधिकारी-कर्मचार्‍यांची सहज ओळख व्हावी, या उद्देशाने सर्वांना ओळखपत्र बंधनकारक केले आहे. हे ओळखपत्र सर्वांना सहज बघता येईल, अशा दर्शनी भागावर लावण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने ७ मे रोजी दिले आहेत.
नागरिक आणि ग्रामस्थ त्यांच्या कामाने नेहमी कोणत्या ना कोणत्या शासकीय कार्यालयात जातात. त्यांना काम असलेल्या अधिकारी किंवा कर्मचार्‍याची ओळख नसल्याने त्यांना नेमक्या कोणत्या कर्मचार्‍याला भेटावे किंवा अधिकार्‍यांकडे जावे, याबाबत माहिती नसते. कर्मचार्‍यांची ओळख पटविणारी कोणतीही माहिती कर्मचारी देत नाहीत किंवा ओळखपत्र मागितल्यानंतर कर्मचारी ते संबंधित नागरिकांना दाखवित नाही. यातून त्यांची फसगत होणे किंवा दलालांच्या हाती पडून नाहक त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्व शासकीय कर्मचार्‍यांना ओळखपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. हे ओळखपत्र दर्शनी भागावर लावल्या जात नसल्याने नागरिकांची अडचण होत असल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे सर्वच कर्मचार्‍यांनी त्यांचे ओळखपत्र दर्शनी भागावर लावणे बंधनकारक करणारा आदेश ७ मे रोजी सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. पी.एस. मीना यांनी दिला आहे. 
** ... तर होईल कारवाई
ओळखपत्र दर्शनी भागावर लावण्यात कर्मचारी व अधिकारी कुचराई करतात. त्यामुळे ओळखपत्र असूनही कर्मचार्‍याची ओळख होत नाही. अशा कर्मचार्‍यांवर वरिष्ठ अधिकार्‍यांनी कारवाई करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत.