शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

करपलेल्या पीकावर भागविली जाते जनावरांची भूक !

By admin | Updated: July 20, 2015 23:09 IST

पश्‍चिम व-हाडातील चित्र: ८0 लाख हेक्टरवरील पेरणी संकटात !

ब्रम्हानंद जाधव/मेहकर (बुलडाणा) : पावसाअभावी विदर्भात जवळपास ८0 लाख हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. पावसाअभावी पिकं करपली असून, करपलेल्या पिकांमध्ये वखर घालण्याऐवजी बळीराजा त्या पिकांवर जनावरांची भूक भागवित असल्याचे वास्तव समोर आले आहे. विदर्भात मृग नक्षत्राच्या सुरूवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकर्‍यांनी खरीपाची पेरणी आटोपली; मात्र पेरणीनंतर एक महिन्यापासून पावसाने दडी मारली. त्यामुळे विदर्भातील सुमारे ८0 लाख हेक्टर क्षेत्रावरील पेरणी संकटात सापडली आहे. कमी पावसाचा फटका केवळ शेतकर्‍यांनाच नाही तर मुक्या जनावरांनाही बसत आहे. जनावरांची चार्‍यासाठी तर शेतकर्‍यांची पशुधन वाचविण्यासाठी व मिळेल तेथून चारा आणण्यासाठी भटकंती सुरू आहे. पश्‍चिम वर्‍हाडात एकूण १५ लाख ९५ हजार ९१६ जनावरे आहेत. त्यामध्ये अकोला जिल्ह्यात २ लाख ७७ हजार ८८१ व वाशिम जिल्ह्यात ३ लाख ४ हजार ३४७ जनावरे आहेत. बुलडाणा जिल्ह्यात मेंढय़ा १ लाख २९ हजार ८३९, शेळ्या २ लाख ६७ हजार ४५१ व इतर जनावरे ६ लाख १६ हजार ३९८ आहेत. एकूण १0 लाख १३ हजार ६८८ पशुधन एकट्या बुलडाणा जिल्ह्यात आहे. वाशिम जिल्ह्यात २ लाख ४१ हजार ८६२ मोठी जनावरे असून, ६२ हजार ७८१ छोटी जनावरे आहेत. लाखो जनावरांच्या तोंडाला दिवसाकाठी १0 लाख टनापेक्षा जास्त चारा लागतो. पावसाअभावी सुकत चाललेल्या पिकांवर वखर चालविण्यापेक्षा, या पिकांचा वापर जनावरांना चारण्यासाठी केला जात असल्याचे गंभीर चित्र दिसत आहे. *जनावरांचे खाद्य विकत घेणे कठीण पावसाने उघडीप दिल्याने रानावनात गवत उगवले नाही. परिणामी गुरांचे चार्‍याअभावी हाल होत आहे. सध्या ढेप १ हजार ४ रुपये क्विंटल तर तुरीचे कुटार १ हजार ३00 रुपये क्विंटल दराने विकले जात आहे. तूरीचे कुटार, कडबा कुट्टी, ढेप, सरकी हे जनावरांचे खाद्यही महागल्याने ते विकत घेणे शेतकर्‍यांना कठीण झाले आहे. चार्‍याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असल्याने पश्‍चिम वर्‍हाडातील १५ लाख ९५ हजार ९१६ जनावरांचे भविष्य बिकट असल्याचे चित्र दिसत आहे.