शेकडो शेतकऱ्यांनी पिकांवर फिरविला वखर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 01:15 PM2019-07-27T13:15:21+5:302019-07-27T13:15:32+5:30

अकोला : जिल्ह्यात आजमितीस ८७ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली; परंतु पावसाने दीर्घ दडी मारली असून, पिके करपू लागल्याने शेकडो शेतकऱ्यांनी पिकांवर वखर फिरविला आहे.

 Hundreds of farmers distroy their crops | शेकडो शेतकऱ्यांनी पिकांवर फिरविला वखर!

शेकडो शेतकऱ्यांनी पिकांवर फिरविला वखर!

Next

अकोला : जिल्ह्यात आजमितीस ८७ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली; परंतु पावसाने दीर्घ दडी मारली असून, पिके करपू लागल्याने शेकडो शेतकऱ्यांनी पिकांवर वखर फिरविला आहे.
जिल्ह्यात खरीप हंगामातील सरासरी क्षेत्र ४ लाख ८० हजार ५८६ हेक्टर आहे. कृषी विभागाने यावर्षी ४ लाख ८० हजार हेक्टर पेरणीचे उद्दिष्ट ठेवले होेते. त्यापैकी आतापर्यंत ४ लाख १७ हजार ५६ हेक्टर, ८७ टक्के पेरणी झाली आहे. यात कापूस पेरणीचे उद्दिष्ट १ लाख ६५ हजार होते. तथापि, १ लाख ४७ हजार ७९२ हेक्टर ९७ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सोयाबीनचे जिल्ह्यात सरासरी क्षेत्र २ लाख ३ हजार ५ हेक्टर आहे.
यावर्षी १ लाख ६५ हजार पेरणीचे उद्दिष्ट होते.
त्यापैकी १ लाख ७५ हजार ४१ हेक्टरवर ८६ टक्के सोयाबीनची पेरणी झाली आहे. तूर ५५ हजार ३० हेक्टर म्हणजेच ९४ टक्के, मूग १६ हजार ९७३ हेक्टर म्हणजेच ५६ टक्के पेरणी करण्यात आली आहे. उडिदाचे सरासरी क्षेत्र जिल्ह्यात ११ हजार ९७८ हेक्टर आहे. यावर्षी १२ हजार ५९८.८ हेक्टर म्हणजे १०५ टक्के पेरणी झाली आहे. ज्वारीची पेरणी गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी सुधारली आहे. २२,७१५ हेक्टर सरासरी ज्वारीचे क्षेत्र आहे. १८ हजार ६०० पेरणीचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ८ हजार ८०३.७ हेक्टरवर ३९ टक्के पेरणी झाली आहे.
अकोला तालुक्यात सर्वाधिक १ लाख ६ हजार २८० हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. कृषी विभागाने १ लाख ४ हजार ४४० हेक्टर पेरणीचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यापैकी आजमितीस ८९,४४२ हेक्टर म्हणजेच ८४ टक्के पेरणी आटोपली. बाळापूर तालुक्यात सरासरी ६० हजार १६ हेक्टरच्या तुलनेत ६१ हजार १८७ हेक्टरवर पेरणी झाली. अकोट तालुक्यात सरासरी ६८,४३४ हेक्टरच्या तुलनेत ६६ हजार २९८ हेक्टरवर ९७ टक्के पेरणी झाली. तेल्हारा तालुक्यात ५६ हजार ६६८ सरासरी क्षेत्रापैकी ४३,७८७ हेक्टरवर ७७ टक्के पेरणी झाली. बार्शीटाकळी तालुक्यात सरासरी ६३,४९४ हेक्टरपैकी ५४,५५२ हेक्टरवर ८६ टक्के पेरणी झाली.


- अनेक भागात पेरण्या उलटल्या!
यावर्षी पावसाने विलंब केल्याने उशिरा पेरण्या झाल्या. त्यानंतर प्रदीर्घ दडी मारल्याने पिके करपल्याने शेतकºयांनी त्यावर वखर फिरविला.

 

Web Title:  Hundreds of farmers distroy their crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.