शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना मोठा झटका! मतदानाच्या आधीच राष्ट्रवादीचा उमेदवारच भाजपात; BJP ला दिला पाठिंबा
2
अंबरनाथमध्ये शिंदेसेनेची खेळी, भाजपाला बसला झटका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लागली लॉटरी
3
Pune Municipal Election: "...तर मला दिल्लीत जाऊन चर्चा करावी लागेल"; युती धर्माच्या विधानानंतर अजित पवारांचा इशारा
4
भाजपा-AIMIM युतीचा दुसरा अंक! एमआयएमच्या पाठिंब्यावर BJP नेत्याचा मुलगा बनला स्वीकृत नगरसेवक
5
सायबर हल्ल्यापासून बचावासाठी वापरा USB कंडोम, कुठे अन् कसा वापर करायचा? जाणून घ्या...
6
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची अचानक तब्येत बिघडली; दिल्लीतील AIIMS मध्ये दाखल
7
Crime: सेक्ससाठी नकार देणाऱ्या पत्नीची गळा आवळून हत्या, पोस्टमॉर्टम रिपोर्टमुळं फुटलं पतीचं पितळ!
8
Video: 'माझा काय संबंध, मला...', मुस्तफिजूर रहमानबाबत प्रश्न विचारताच नबी पत्रकारावर चिडला
9
Shikhar Dhawan And Sophie Shine Engagement : "आम्ही आयुष्यभरासाठी..." शिखर-सोफीनं शेअर केली साखरपुड्याची गोष्ट
10
Crime: रस्त्यातून अपहरण, जबरदस्तीनं दारू पाजली अन् रात्रभर सामूहिक अत्याचार; बिहार हादरलं!
11
TCS च्या नफ्यात १४ टक्क्यांची मोठी घट! तरी गुंतवणूकदारांना करणार मालामाल; लाभांश जाहीर
12
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान कार्यालयाचा पत्ता बदलणार; 'सेवा तीर्थ'साठी किती खर्च?
13
हत्येनंतर मृतदेह पाण्यानं स्वच्छ धुतला अन् त्यानंतर...; थरकाप उडवणारी घटना समोर, नरभक्षकाला अटक
14
अंघोळीसाठी गेलेली मुलं बाहेर येईना; ४ वर्षांच्या रयानचा मृत्यू, दरवाजा तोडताच दिसलं भयंकर
15
अमेरिकेने व्हेनेझुएलामध्ये 'सोनिक वेपन' वापरले? हे हत्यार कानातून रक्त काढते
16
सोन्याच्या दुकानात चोरी केली, परत जाताना गुटखा खाण्यासाठी मास्क काढला अन् सीसीटीव्हीत कैद झाला, पोहोचला तुरुंगात
17
Travel : २६ जानेवारीचा लॉन्ग वीकेंड आणि वृंदावनची वारी! कान्हाच्या नगरीत फिरण्यासाठी 'हे' आहे परफेक्ट प्लॅनिंग
18
आमचा अणुबॉम्ब भारत, इस्रायल, अमेरिकेच्या विरोधात...', अणु सिद्धांतावर पाकिस्तानचा मोठा दावा
19
"आम्ही कुणाला गुलाम बनवलं नाही, आम्ही तर...", काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ४० वर्षांनी 'ती' म्हणाली 'हो', तरुणपणी झालं नाही लग्न; आता जुळल्या रेशीमगाठी
Daily Top 2Weekly Top 5

१० प्रभागांत 'हॉट सीट'; निवडणुकीत 'बिग फाइट', भाजपचे महानगराध्यक्ष, माजी महापौर, सभापतींच्या लढतीकडे लक्ष!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 17:54 IST

अकोला महानगरपालिका निवडणुकीत यावेळी अनेक प्रभाग असे आहेत जिथे तिरंगी आणि चौरंगी लढती होताना दिसत आहे. त्यामुळे काही ठिकाणी निवडणुकीला रंगत आली आहे.

Akol Municipal Election 2026: अकोला महानगरपालिका निवडणुकीत यंदा अनेक प्रभागांत थेट, तिरंगी आणि चौरंगी अशा चुरशीच्या लढती रंगल्या आहे, तर १० प्रभागात पदाधिकारी व नेत्यांच्या 'बिग फाइट' होत आहेत. भाजप, काँग्रेस, उद्धवसेना, शिंदेसेना, राष्ट्रवादी (शरद पवार व अजित पवार पक्ष), वंचित बहुजन आघाडी आणि एआयएमआयएम यांच्या तुल्यबळ उमेदवारांमुळे या प्रभागांतील निवडणूक रंगतदार झाली आहे.

प्रभाग क्रमांक ५ मध्ये दोन जागांवर थेट 'बिग फाइट' होत आहे. प्रभाग ५-बमध्ये भाजप महानगराध्यक्ष जयंत मसने आणि उद्धवसेनेचे मनीष मोहोड आमने-सामने आहेत, तर प्रभाग ५-ड मध्ये भाजपचे माजी महापौर विजय अग्रवाल यांच्याविरोधात उद्धवसेनेचे नवखे दीपक गवारे, काँग्रेसचे रवी पाटणे आणि वंचितचे शुद्धोधन पळसपगार यांच्यात चौरंगी लढत आहे. 

प्रभाग ६-क मध्ये माजी नगरसेविका सारिका जयस्वाल आणि भाजप गटनेते राहुल देशमुख यांच्या अर्धांगिनी निकिता देशमुख यांच्यातील लढत लक्षवेधी आहे. प्रभाग ७-ड मध्ये महानगर विकास समितीचे माजी उपमहापौर सुनील मेश्राम, माजी नगरसेवक शेख फरीद, एमआयएमचे रशीद खान लोधी आणि वंचितचे महेंद्र डोंगरे यांच्यात चौरंगी लढत होणार आहे.

१५ मध्ये अनुभवी विरुद्ध नवखे !

प्रभाग १५-डमध्ये मनपा स्थायी समितीचे माजी सभापती भाजपचे बाळ टाले यांच्यासमोरगेल्यावेळीही निवडणूक लढलेले उद्धवसेनेचे लक्ष्मण पंजाबी, शिंदेसेनेचे समर्थ शर्मा आणि काँग्रेसचे प्रशांत प्रधान यांच्यात बहुरंगी लढत होताना दिसत आहे. अनुभवी विरुद्ध नवखे अशी ही लढत होत असल्याने, यालढतीकडे लक्ष लागले आहे.

प्रभाग १६, १७ आणि २० : प्रतिष्ठेचा सवाल

प्रभाग १६-ड मध्ये भाजपचे माजी स्थायी समिती सभापती संजय बडोणे आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे माजी स्थायी समिती सभापती रफिक सिद्दीकी यांच्यात काट्याची लढत होत आहे.

प्रभाग १७-ड मध्ये भाजपचे करण साहू यांच्यासमोर काँग्रेसचे आझाद खान, शिंदेसेनेचे शहरप्रमुख व माजी नगरसेवक राजेश मिश्रा आणि एआयएमआयएमचे फैसल अहमद यांचे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे या चौघांमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळणार आहे.

माजी उपमहापौर, माजी नगरसेवक लढत रंगतदार

भाजप-उद्धवसेना थेट संघर्ष प्रभाग २०-अमध्ये माजी नगरसेवक विजय इंगळे (उद्धवसेना) आणि भाजपचे नवखे उमेदवार मंगेश झिने यांच्यात काट्याची लढत अपेक्षित आहे. तर प्रभाग २०-डमध्ये भाजपचे माजी उपमहापौर विनोद मापारी आणि उद्धवसेनेचे शंकर लंगोटे यांच्यात थेट सामना रंगला आहे. या सर्वांच्या लढतीत कोण बाजी मारणार, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Akola Municipal Election: 'Big Fights' in 10 Wards; Key Battles

Web Summary : Akola faces fierce municipal elections with 'big fights' in 10 wards. BJP leaders clash with Shiv Sena and Congress candidates. Key battles include former mayors and committee heads, making it a high-stakes election.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Akola Municipal Corporation Electionअकोला महानगरपालिका निवडणूक २०२६Electionनिवडणूक 2026BJPभाजपाcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस