खडकी परिसरातून गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:14 IST2021-06-28T04:14:53+5:302021-06-28T04:14:53+5:30
अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडकी परिसरातून एक इसम दुचाकीवरून प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची अवैधरीत्या वाहतूक व विक्री करीत ...

खडकी परिसरातून गुटखा जप्त
अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडकी परिसरातून एक इसम दुचाकीवरून प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची अवैधरीत्या वाहतूक व विक्री करीत असल्याच्या माहितीवरून अन्न व औषध प्रशासन विभागाने रविवारी सायंकाळी छापा टाकला. या युवकाकडून गुटख्यासह तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
खडकी येथील रहिवासी घनश्याम चौधरी हा एमएच ३० एडब्ल्यू ८८३५ क्रमांकाच्या दुचाकीवरून स्वीट सुपारी व गुटख्याची अवैधरीत्या वाहतूक करीत असताना अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी रावसाहेब वाकडे यांनी छापा टाकला. या इसमाकडून प्रतिबंधित स्वीट सुपारी व गुटखा असा एकूण तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी इसमाविरुद्ध खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त सागर तेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी रावसाहेब वाकडे यांनी केली.