शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

युवकांचा सर्वांगिण विकास करण्याची तळमळ असलेला समुह म्हणजे गुरुदेव सेवा मंडळ - आचार्य वेरुळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 2:43 PM

भगव्या टोप्यांचा जत्था म्हणजे गुरुदेव सेवा मंडळ नाही तर सर्वांगिण विकास करण्याची तळमळ ज्यांच्या मनात आहे, अशा समुहाला गुरुदेव सेवा मंडळ राष्ट्रसंतांनी म्हटले आहे.

ठळक मुद्देराष्ट्रसंत विचार साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या  दिवशी श्री गुरुदेव सेवा मंडळाची दशा व दिशा या विषयावर परिसंवाद पार पडला. आजीवन प्रचारक डॉ. भास्करराव विघे गुरुजी यांनी राष्ट्रसंतांना अभिप्रेत असलेले युवक आपल्या भाषणातून मांडले.

अकोला (आद्य किर्तनकार स्व. आमले महाराज साहित्य नगरी) :  संस्कार शिबिरातून हजारो युवक दरवर्षी बाहेर पडतात, महाराजांचा विचार घेऊन ते काम करू लागतात या युवकांना दिशा मिळाली पाहीजे, असे कार्य मुळ संस्थेने करणेसुध्दा तितकेच महत्वाचे आहे. मात्र दुर्दैवाने तसे होत नाही. भगव्या टोप्यांचा जत्था म्हणजे गुरुदेव सेवा मंडळ नाही तर सर्वांगिण विकास करण्याची तळमळ ज्यांच्या मनात आहे, अशा समुहाला गुरुदेव सेवा मंडळ राष्ट्रसंतांनी म्हटले आहे. हा धागा लक्षात ठेऊन सेवा मंडळाची दिशा ठरली पाहिजे, असे मत आपल्या अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ गुरुदेव प्रचारक आचार्य वेरुळकर गुरुजी यांनी मांडले.    डाँ. बाबासाहेब आंबेडकर खुले  नाट्यगृहात सुरु असलेल्या सहाव्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या  दिवशी श्री गुरुदेव सेवा मंडळाची दशा व दिशा या विषयावर परिसंवाद पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आजीवन प्रचारक डॉ. भास्करराव विघे गुरुजी, डॉ. माधवराव सुर्यवंशी, ज्येष्ट प्रचारक तिमांडे महाराज, ग्रामगिताचार्य सुनील महाराज लांजुळकर आदी उपस्थित होते.    या परिसंवादाचे प्रमुख वत्तेâ म्हणून आचार्य वेरूळकर गुरुजी यांनी युवकांना ग्रामगीतेच्या आचरणाचे आवाहन केले.  राष्ट्रसंतांनी प्रचारकाकडे विशेष लक्ष दिले आहे. सध्याच्या काळात गावागावात महाराजांच्या विचारांचे कार्यक्रम होत आहेत. मात्र या कार्यक्रमाला पाहिजे ती दिशा मिळाली नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखविली.     ग्रामगीता नुसतेच वाचून चालणार नाही तर ती आचरणात सुद्धा आणली पाहिजे, यासाठी गुरुदेव सेवा मंडळाने गावपातळीवर काम मोठ्या प्रमाणावर सुरु झाले आहे, मात्र कार्याला दिशा मिळाली नाही. हि दिशा मिळण्यासाठी सेवा मंडळाच्या प्रत्येक कार्यकत्र्याने आपले वर्तन चांगले ठेवले पाहिजेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ गुरुदेव प्रचारक आचार्य वेरुळकर गुरुजी यांनी येथे केले.     आजीवन प्रचारक डॉ. भास्करराव विघे गुरुजी यांनी राष्ट्रसंतांना अभिप्रेत असलेले युवक आपल्या भाषणातून मांडले. आज या संमेलनातून शेकडो युवक कार्यकर्ते निर्माण झाले पाहिजेत, आणि राष्ट्रसंतांचा विचार त्यांनी घराघरात पोहोचवला पाहिजे, असा आशावाद व्यक्त करीत राष्ट्रसंतांची ग्रामविकास चळवळ विषद केली. गावाचा विकास करायचा असेल तर युवकांनी जागृत झालं पाहिजे. ही जागृती राष्ट्रसंतांच्या विचारातून मिळेल. त्यासाठी राष्ट्रसंतांचे साहित्याने प्रत्येकांने वाचली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.    युवकांनी नुसते शिक्षण घेऊन चालणार नाही तर रोजगाराकडे वळले पाहिजे, गुरुदेव सेवा मंडळाच्या तरुणांनी इतर संप्रदायांंना दिशा देण्याचे काम राष्ट्रसंताच्या विचारातून निर्भयता मिळते, ही निर्भयता सेवा मंडळातील युवकांमध्ये आली पाहिजेत, असा विचार त्यांनी व्यक्त केला. या परिसंवादाचे सुत्रसंचलन प्रा. मनिष  देशमुख यांनी केले.

टॅग्स :AkolaअकोलाRashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराजcultureसांस्कृतिक