शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

अटी-शर्तीमध्ये महाआघाडीचे बारा वाजणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 2:39 PM

महाआघाडीतील संभाव्य घटकपक्षांच्या अटी-शर्तीमध्येच महाआघाडीचे बारा वाजणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

- राजेश शेगोकारअकोला: पाच राज्यांतील निवडणूक निकालावर भाष्य करताना भारिप-बमसंचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी वेगळा सूर लावला. या निकालांमुळे संभाव्य महाआघाडीमध्ये बिघाडी निर्माण होईल व बिघाडी झालेल्या पक्षांमधून नवी आघाडी तयार होईल, असे सूतोवाच त्यांनी केले. महाआघाडीच्या संदर्भात चाचपणी होत असतानाच निवडणूक निकालाच्या निमित्ताने अ‍ॅड. आंबेडकरांच्या या विधानातील ‘बिटवीन द लाइन्स’ खूप काही सांगून जाते. एकीकडे काँग्रेस भारिप चालेल; पण एमआयएम नाही, असे जाहीरपणे बजावत असतानाच त्यांना एमआयएम नको तर आम्हाला राष्टÑवादी नको, असे प्रत्युत्तर अ‍ॅड. आंबेडकर यांनी दिल्याने महाआघाडीच्या निर्मितीपूर्वीच बिघाडीचे बीजारोपण झाल्याचे स्पष्ट होत आहे. दुसरीकडे गेल्या आठवड्यात स्वाभिमानीचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी बुलडाण्यात राज्य कार्यकारिणीची बैठक घेऊन सहा लोकसभा मतदारसंघांवर दावा करून दबाव वाढविला आहे. महाआघाडीतील संभाव्य घटकपक्षांच्या अटी-शर्तीमध्येच महाआघाडीचे बारा वाजणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे

अ‍ॅड. आंबेडकरांचा काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेसवर असलेला रोष सर्वश्रुत आहे. त्यामुळे ते या दोन्ही पक्षांसोबत आघाडी करण्यास कधीही इच्छुक होत नाहीत. ते जाणीवपूर्वक तडजोड होऊ शकणार नाहीत, अशा अटी टाकतात. परिणामी, धर्मनिरपेक्ष विचारांच्या मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा भाजपा-सेनेला होतो, असा आरोप अ‍ॅड. आंबेडकर यांच्यावर सातत्याने होत आला आहे. या पृष्ठभूमीवर भाजपाचा झंझावात थांबविण्यासाठी काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेसने मित्रपक्षांना सोबत घेऊन आघाडीचे संकेत देत आंबेडकरांबाबत सकारात्मकता दाखविल्याने महाआघाडीत आंबेडकरांच्या प्रवेशाबाबत चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसने वेळोवळी आपल्या व्यासपीठावरून त्यांच्या सहभागाबद्दल प्रयत्न सुरू असल्याची ग्वाही दिली. दरम्यानच्या काळात अ‍ॅड. आंबेडकर यांनी ‘एमआयएम’सोबत मैत्री जाहीर केल्याने काँग्र्रेसच्या वर्तुळात खळबळ उडाली व महाआघाडीच्या प्रयत्नांमध्ये एमआयएमचा अडसर निर्माण झाला.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आंबेडकर चालतील; पण ‘एमआयएम’ नको, असे जाहीरपणे स्पष्ट करताच अ‍ॅड. आंबेडकरांनी राष्टÑवादीवर शरसंधान करीत आम्हाला राष्टÑवादी नको, अशी भूमिका जाहीर केली. गुरुवार, १३ डिसेंबर रोजी नागपुरात झालेल्या मेळाव्यातही ‘एमआयएम’ची सोबत सोडणार नाही, असेच त्यांनी स्पष्ट केल्यामुळे महाआघाडी निर्माण होण्यापूर्वीच बिघाडीचे बीजारोपण झाल्याचे स्पष्ट झाले.अ‍ॅड. आंबेडकर यांनी ‘बहुजन वंचित आघाडीच्या’ बॅनरखाली काँग्रेसला लोकसभेच्या १२ जागांचा प्रस्ताव दिला आहे. तो प्रस्ताव काँग्रेस मान्य करेल, अशी स्थिती नाही. दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनाही आक्रमक झाली असून, बुलडाण्यात झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत विदर्भातील चार मतदारसंघांवर दावा करण्याचे ठरविण्यात आले आहे. हातकणंगले, माढा व विदर्भातील वर्धा व बुलडाणा या चार मतदारसंघांबाबत राजू शेट्टी आग्रही आहेत. यापैकी हातकंणगलेमध्ये ते स्वत:, वर्ध्यात माजी मंत्री सुबोध मोहिते व बुलडाण्यात रविकांत तुपकर असे त्यांचे उमेदवारही ठरले आहेत. माढा मतदारसंघात स्वाभिमानीने जोरदार टक्कर देत मोहिते पाटलांचा गड हादरवला होता. अवघ्या २५ हजार मतांनी स्वाभिमानीचा पराभव झाला होता, त्यामुळे या चार मतदारसंघांबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना तडजोड करण्याची शक्यता दिसत नाही. महाआघाडीतील संभाव्य घटकपक्षांच्या मागण्या लक्षात घेता पाच राज्यांतील निवडणुकीमुळे रिचार्ज झालेली काँग्रेस या मागण्या मान्य करण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे महाआघाडीचे बारा वाजतील, हेच संकेत सध्या तरी मिळत आहेत.

कोणाला किती जागा हव्यात?महाराष्टÑात लोकसभेच्या ४८ जागांपैकी काँग्रेस व त्यांचे मित्रपक्ष २६ तर राष्टÑवादी व त्याचे सहकारी पक्ष २२ जागा लढवितात. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेला चार अ‍ॅड. आंबेडकरांना १२, शेकाप, सीपीएम, सीपीआय, समाजवादी पक्ष या घटकपक्षांच्याही मागण्या आहेतच, त्यामुळे घटकपक्षांच्या अटी-शर्तीमध्ये आघाडीचेच बारा वाजण्यास वेळ लागणार नाही.

 

टॅग्स :AkolaअकोलाPoliticsराजकारणcongressकाँग्रेसBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर