शहरं
Join us  
Trending Stories
1
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
2
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
3
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
4
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
5
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
6
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
7
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
8
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
9
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
10
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
11
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
12
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
13
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
14
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
15
धार भोजशाळा 'सरस्वती मंदिर'च! HC कडून हिंदूंना पूजेचा अधिकार, नमाजचा आदेश रद्द; आली मुस्लीम पक्षाची पहिली प्रतिक्रिया
16
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
17
सावधान! स्मार्टफोनचा रिकामा डबा कचरा समजून फेकून देताय? थांबा, मिळू शकतो लाखोंचा फायदा
18
"एकतर तहासाठी तयार व्हा अथवा विनाशाचा सामना करा, ५ मिनिटांत..."; चीन दौऱ्यावरून परतताना ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
19
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
20
Adhik Maas 2026: अधिक मासाला 'धोंड्याचा' मास म्हणण्यामागे काय आहे नेमके कारण?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामगीता परीक्षेत पाच हजारांवर विद्यार्थी उत्तीर्ण

By admin | Updated: May 10, 2014 20:30 IST

ग्रामगीता युगप्रवर्तक ग्रंथाचा अभ्यास

अकोला : शालेय विद्यार्थ्यांना ग्रामगीता युगप्रवर्तक ग्रंथाचा अभ्यास व्हावा, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे समग्र वाङ्मय वाचण्यात यावे, विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार घडावे, याकरिता आयोजित करण्यात आलेल्या ग्रामगीता जीवन विकास परीक्षेत ५३१० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
अ.भा. श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम अंतर्गत १९९० पासून ग्रामगीता जीवन विकास परीक्षा रामटेके दादांच्या अध्यक्षतेखाली सहा विभागात घेण्यात येते. प्रथम प्रवेश परिचय, प्रवीण, ग्रामनाथ, ग्रामरत्न व ग्राम गीताचार्य या परीक्षा घेऊन पदवीदान केले जाते. आतापर्यंत जिल्ह्यात २०१० ते २०१४ चार वर्षांत ३६०५० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. अकोला जिल्हा श्री गुरुदेव सेवामंडळाचे जिल्हा सेवाधिकारी भानूदास कराळे यांनी शाळा- महाविद्यालयांना परीक्षेसाठी आवाहन केले होते. ८ जून रोजी आयोजित जिल्हा मेळाव्यात प्रथम येणार्‍या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येईल. यावर्षी नवीन सत्रात २९ विद्यार्थी ग्रामगीताचार्य परीक्षेला बसणार आहेत. श्री गुरुदेव सेवाश्रम या परीक्षा केंद्रातून प्रवीण गटातून डॉ. सु.अ. चेडे ७० गुण घेऊन प्रथम आले. ग्रामनाथ गटातून नीलिमा विजय मोडक ७१ गुण घेऊन प्रथम आल्या. ग्रामरत्न गटातून प्रभावती खरतळकर व ॲड. वंदन कोहाडे ७० गुण घेऊन प्रथम आले. ॲड. रामसिंह राजपूत याच्या हस्ते प्रमाणपत्र उत्तीर्ण विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काशीराम गावंडे होते. २०१४-१५ च्या सत्रात सर्वांनी सहभागी होऊन परीक्षेकरिता विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन भानुदास कराळे, सुधाताई जंजाळ, डॉ. दिलीप कळमकर, प्रा. गायकवाड, रामराव पाटेखेडे, गोवर्धन खवले, जयंतराव इंगोले यांनी केले आहे.