शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
2
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
3
Top Marathi News LIVE Updates: कोलकाता विधानसभा निवडणूक दुसरा टप्पा: दुपारी १ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान
4
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
5
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
6
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
7
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
8
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
9
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
10
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
11
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
12
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
13
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
14
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
15
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
16
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
17
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
18
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
19
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
20
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
Daily Top 2Weekly Top 5

२५ कोटींचा मदतनिधी होणार शासनजमा!

By admin | Updated: March 6, 2015 01:52 IST

अकोला जिल्ह्यातील ६५ हजारांवर दुष्काळग्रस्त शेतकरी वंचित.

संतोष येलकर/ अकोला : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त २ लाख ८३ हजार ६0६ शेतकर्‍यांच्या मदतीसाठी शासनामार्फत उपलब्ध निधीतून गुरुवारपर्यंंत २ लाख १७ हजार ७१७ शेतकर्‍यांच्या मदतीसाठी ११0 कोटी १२ लाखांची मदत महसूल विभागामार्फत बँकांमध्ये जमा करण्यात आली. मदतीचे वाटप ७ मार्चपर्यंंत करावयाचे असले तरी; ६५ हजार ८८९ शेतकर्‍यांचे बँक खाते क्रमांक महसूल विभागाकडे उपलब्ध नाहीत. त्यामुळे खाते क्रमांकाविना जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त ६५ हजारांवर शेतकर्‍यांच्या मदतीची २५ कोटींची रक्कम शनिवारी शासनाकडे परत पाठविण्यात येणार आहे.यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने जिल्ह्यात नापिकीमुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला. दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी शासनाकडून जाहीर झालेल्या मदतीमध्ये जिल्ह्यातील सातही तालुक्यातील दुष्काळग्रस्त २ लाख ८३ हजार ६0६ शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पहिल्या टप्प्यात ९ जानेवारी रोजी ७५ कोटी ७ लाख आणि दुसर्‍या टप्प्यात ४ फेब्रुवारी रोजी ७५ कोटी ११ लाखांचा निधी प्राप्त झाला. उपलब्ध निधीतून १४५ कोटी ९ लाख ६९ हजार ३६ रुपयांचा मदतनिधी दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील तहसील कार्यालय स्तरावर वितरित करण्यात आला. मदतीची रक्कम संबंधित शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या याद्या आणि मदतीच्या रकमेचे धनादेश बँकांमध्ये जमा करण्याचे काम गत १४ जानेवारीपासून तहसील कार्यालयांकडून सुरू करण्यात आले. गुरुवार, ५ मार्चपर्यंंत जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त २ लाख ८३ हजार ६0६ शेतकर्‍यांपैकी २ लाख १७ हजार ७१७ शेतकर्‍यांच्या मदतीसाठी ११0 कोटी १२ लाख ८ हजार ५३९ रुपयांची मदत बँकांमध्ये जमा करण्यात आली. ७ मार्चपर्यंंत मदतीच्या रकमेचे धनादेश बँकांमध्ये जमा करण्याचा आकडा १२0 कोटींवर जाण्याची शक्यता गृहित धरली तरी, ६५ हजार ८८९ शेतकर्‍यांचे बँक खाते क्रमांकच महसूल विभागाकडे उपलब्ध नाहीत. शासनाच्या आदेशानुसार दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांची मदत ७ मार्चपर्यंंत शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करावयाची आहे; मात्र दुष्काळग्रस्त ६५ हजारांवर शेतकर्‍यांचे बँक खाते क्रमांक महसूल विभागाकडे उपलब्ध नसल्याची स्थिती आहे. बँक खाते क्रमांकाविना ६५ हजारांवर दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांचा २५ कोटींवर मदतनिधी ७ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे जमा करण्यात येणार आहे. मदतीचा निधी उपलब्ध असूनही बँक खाते क्रमांक उपलब्ध नसल्याने, दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांचा कोट्यवधीचा मदतनिधी शासनजमा करण्याची वेळ महसूल विभागावर आली आहे.