शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘थॅलेसीमिया’ग्रस्तांसाठी शासनाने आर्थिक तरतूद करावी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 12:37 IST

अकोला: केंद्र व राज्य शासनाने आपल्या बजेटमध्ये ‘थॅलेसीमिया’ग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी आर्थिक तरतूद करून पोलिओप्रमाणे थॅलेसीमियामुक्त भारतासाठी सकारात्मक पाऊल टाकावे, असे आवाहन थॅलेसीमिया सोसायटीचे अध्यक्ष हरीश आलिमचंदानी यांनी केले.

अकोला: केंद्र व राज्य शासनाने आपल्या बजेटमध्ये ‘थॅलेसीमिया’ग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी आर्थिक तरतूद करून पोलिओप्रमाणे थॅलेसीमियामुक्त भारतासाठी सकारात्मक पाऊल टाकावे, असे आवाहन थॅलेसीमिया सोसायटीचे अध्यक्ष हरीश आलिमचंदानी यांनी केले.थॅलेसीमिया दिनानिमित्त मेहरबानू महाविद्यालय येथे अकोला थॅलेसीमिया सोसायटीतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी डॉ. विनीत वरठे, डॉ. सचिन सदाफळे, डॉ. गोपाल माध्यान, कांता आलिमचंदानी, सिंधू सीनियर सिटिझन असोसिएशनचे अध्यक्ष ज्ञानचंद वाधवानी, झुलेलाल महोत्सव समितीचे अध्यक्ष कोडुमल चावला, मार्गदर्शक हरीश परवानी, हेडगेवार रक्तपेढीचे दीपक मायी, नीलेश जोशी, साईजीवन रक्तपेढीचे डॉ. गाढवे, डॉ. पाटणकर, डॉ. निखाडे, डॉ. अशोक ओळंबे, सोसायटीचे कमल आलिमचंदानी यांची उपस्थिती होती. यासंदर्भात देशभरात थॅलेसीमिया सोसायटीतर्फे पंतप्रधान, मुख्यमंत्री तथा संबंधित विभागाचे मंत्री यांना निवेदन देऊन यामध्ये थॅलेसीमियामुक्त भारतासाठी कठोर उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी कमल आलिमचंदानी यांनी दिली. याप्रसंगी थॅलेसीमिया आजारावर आधारित चित्रफीत दाखविण्यात आली. थॅलेसीमिया दिनानिमित्त थॅलेसीमिया सोसायटीच्या डे केअर केंद्रामधून जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये महिला-पुरुष, बच्चे कंपनी व थॅलेसीमियाग्रस्त रुग्णांनी फलकांद्वारे जनजागृती केली. ही रॅली धिंग्रा चौक, गांधी रोड, अमृतवाडी, स्वावलंबी विद्यालय, चिवचिव बाजार मार्गे मेहरबानू विज्ञान महाविद्यालय येथे पोहोचली. येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. प्रास्ताविक हरीश आलिमचंदानी यांनी केले. संचालन सोनाल ठक्कर यांनी, तर आभार राजश्री जोगी यांनी मानले. याप्रसंगी डॉ. आशुतोष पालडीवाल, रोहित जोगी, डॉ. गजानन भगत, सुशील रामटेके, यशपाल जाधव, संदीप राठोड, प्रवीण मराठे, थॅलेसिमीया सोसायटीचे सचिव अश्विन पोपट, सहसचिव संजय डेम्बडा, कोषाध्यक्ष दीपक भानुशाली, श्याम सारभुकन,अनिस खान,राहुल शर्मा, सचिन अंबाडकर, श्रीहरी ठाकरे, संदीप सुरळकर, प्रवीण शिरसाट, रमेश लुंडवाणी, सनी पाहुजा, प्रकाश धर्माळे, प्रदीप उत्तमचंदनी, भीमा मुलांनी, नूतन जैन, रवी आलिमचंदानी, हरीश शहा, अमित थडानी, सुरेश मनवानी, नरेश भाई, अतुल गवई, राहुल शिरसाट, विठ्ठल बहाळ, मधुर आलिमचंदानी, संदीप आलिमचंदानी, रूपाली ठाकरे, सुनीता आलिमचंदानी, रेखा शिरसाट, बहुसंख्य महिला-पुरुष, नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते.सामाजिक संघटनांचा सत्कारथॅलेसीमिया क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पारस मित्र मंडळ, उगवा मित्र मंडळ, जिव्हाळा ग्रुप, पूर्वी रत्नपारखी, निरंकारी मंडळ, निशिकांत बडगे, आशिष कसले, राहुल शर्मा, मारवाडी युवा मंच, श्रीकांत मलिक, विक्रम तिवारी, झुलेलाल महोत्सव समिती, अनंतपुरम ग्रुप, गाडगेबाबा मित्र मंडळ, जलाराम मेडी.सर्च आदी सामाजिक संघटनांना स्मृतिचिन्ह प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य