शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

‘जीएमसी’ने बोरगाव मंजू येथील स्वॅब आधी नाकारले, नंतर स्वीकारले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 10:54 AM

तब्बल अर्धा तास प्रतीक्षा केल्यावर महाविद्यालय प्रशासनातर्फे स्वॅब स्वीकारण्यात आले.

अकोला : बोरगाव मंजू येथून संकलित केलेले स्वॅब शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नाकारण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली. व्हीआरडीएल लॅबमध्ये स्वॅब ठेवण्यास जागा नसल्याचे सांगत केवळ शंभर स्वॅब स्वीकारल्या जाणार असल्याचे रुग्णवाहिका चालकांना सांगण्यात आले. तब्बल अर्धा तास प्रतीक्षा केल्यावर महाविद्यालय प्रशासनातर्फे स्वॅब स्वीकारण्यात आले.आरोग्य यंत्रणेमार्फत मंगळवारी बोरगाव मंजू येथे कोरोनाच्या संदिग्ध रुग्णांचे स्वॅब संकलित करण्यात आले. येथून हे स्वॅब रुग्णवाहिकेद्वारे सर्वोपचार रुग्णालयात आणले गेले; परंतु सायंकाळी ७ वाजल्यामुळे आम्ही स्वॅब घेऊ शकत नसल्याचे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी म्हटल्याची माहिती रुग्णवाहिका चालकांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. त्यामुळे संकलित केलेले स्वॅब आता कुठे ठेवायचे, अशा विचारात पडलेल्या रुग्णवाहिका चालकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील व्हीआरडीएल लॅबसमोरच ठिय्या मांडला. काही वेळानंतर येथील कर्मचाऱ्यांनी केवळ शंभर स्वॅब स्वीकाण्याची भूमिका व्हीआरडीएल लॅबमधील कर्मचाºयांनी घेतली; मात्र उर्वरित स्वॅब ठेवायचे तरी कुठे, असा प्रश्न रुग्णवाहिका चालकांनी उपस्थित केल्यावरही रुग्णालय प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. तब्बल अर्धा तास प्रतीक्षा केल्यानंतर प्रकरणाची सावरासावर करीत, येथील वैद्यकीय अधिकाºयांनी स्वॅब स्वीकारण्यास सुरुवात केली. यापूर्वी देखील असाच काहीसा प्रकार घडल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.जिल्ह्यातील स्वॅब स्वीकारण्यास ‘जीएमसी’ने नकार दिला नाही. डॉ. शिरसाम आणि डॉ. घोरपडे यांनी स्वॅब घेण्याची प्रक्रिया आधीच सुरू केली होती. गैरसमजातून हा प्रकार घडला.- डॉ. मीनाक्षी गजभिये,अधिष्ठाता, जीएसमी, अकोला

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालयcorona virusकोरोना वायरस बातम्या