युवतीने लगावली ठाणेदाराच्या कानशिलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 10:53 IST2020-12-04T10:48:34+5:302020-12-04T10:53:49+5:30

Akola News आराेपीच्या बहिणीने थेट ठाणेदाराशी हुज्जत घलत त्यांच्या कानशिलात लगावल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली.

The girl slapped police inspector in Akola | युवतीने लगावली ठाणेदाराच्या कानशिलात

युवतीने लगावली ठाणेदाराच्या कानशिलात

ठळक मुद्देया प्रकरणाची माहिती पाेलीस खात्यात वाऱ्यासारखी पसरली.पाेलीस खात्याचा वचक संपल्याचीही चर्चा जाेरात सुरू आहे.

अकाेला : शहरातील एका पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हाॅटेलमध्ये तीन युवक जेवणासाठी गेले हाेते. या ठिकाणी जेवण आटाेपल्यानंतर मद्यधुंद युवकांनी हाॅटेलची ताेडफाेड केल्यानंतर या आराेपींना शहरातील एका पाेलीस स्टेशनच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पकडले व त्यानंतर माहिती घेण्यासाठी संबंधित ठिकाणावर जात असतानाच या आराेपींमधील एका आराेपीच्या बहिणीने थेट ठाणेदाराशी हुज्जत घलत त्यांच्या कानशिलात लगावल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली.

अवैध दारू विक्री तसेच अमली पदार्थ विक्री करणाऱ्या दाेन युवकांसाेबत एक तिसरा युवक जेवणासाठी शहराबाहेर असलेल्या एका हाॅटेलमध्ये २९ नाेव्हेबर राेजी गेले हाेते. जेवण आटाेपल्यानंतर पैसे न देता या हाॅटेलच्या मालकास मारहाण करून ताेडफाेड या तीन जणांनी केली. त्यानंतर या प्रकरणी हाॅटेल मालकाने पाेलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पाेलिसांनी गुन्हा दाखल करून आराेपींना ताब्यात घेतले. तीनही आराेपींना घेऊन घटनास्थळावर जात असतानाच एका आराेपीच्या बहीण व आईने पाेलिसांसाेबत हुज्जतबाजी करीत थेट ठाणेदाराच्या कानशिलात लगावली. त्यामुळे वातावरण अचानक स्मशानशांततेचे झाले. या प्रकरणाची माहिती पाेलीस खात्यात वाऱ्यासारखी पसरली. एका आराेपीच्या बहिणीने असा प्रताप केल्याने पाेलीस खात्याचा वचक संपल्याचीही चर्चा जाेरात सुरू आहे. या घटनेमुळे पाेलिसांनी आता आत्मचिंतन करण्याची वेळ आल्याचे बाेलल्या जात आहे.

Web Title: The girl slapped police inspector in Akola