शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
2
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
3
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
4
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
6
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
7
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
8
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
9
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
10
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
11
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
12
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
13
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
14
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
15
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
16
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
17
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
18
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
19
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
20
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा

विष प्राषन केलेल्या युवतीचा अखेर मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2019 12:26 PM

नेहरू पार्क चौकात विष प्राशन केल्यानंतर या युवतीवर उपचार सुरू असताना तिचा रविवारी सायंकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अकोला: दीड वर्षापासून सुरू असलेल्या प्रेमाचे रूपांतर लग्नात व्हावे, या जिद्दीने पेटलेल्या प्रेयसीला प्रियकराने लग्न करण्यास नकार दिल्याने या युवतीने नेहरू पार्क चौकात विष प्राशन केल्यानंतर या युवतीवर उपचार सुरू असताना तिचा रविवारी सायंकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी खदान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास करण्यात येत आहे. लग्नासाठी त्रास देत असल्याची तक्रार शुक्रवारी प्रियकराने पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.बार्शीटाकळी तालुक्यातील खेट्री येथील रहिवासी पवन रामराव इंगोले हा युवक अमरावती येथे करिअर पॉइंट अकॅडमी येथे शिकण्यासाठी गेला. तिथे त्याची ओळख सोनाली नामक युवतीसोबत झाली. त्यानंतर त्यांची मैत्री वाढली. पवनने नोकरी लागल्यानंतर लग्न करू, असे तिला सांगितले. तिने सुरुवातीला हो म्हटले. तिने लग्नाचा तगादा लावला. तसेच २४ फेब्रुवारी २०१९ रोजी त्यांनी पाचशे रुपयांच्या मुद्रांकावर लिहिले ते २०२४ पर्यंत नोकरी लागल्यानंतर लग्न करेल किंवा तिच्या सोबत राहील. त्यानंतर परत त्यांच्यामध्ये लग्नाच्या कारणावरून चर्चा सुरू होती; परंतु प्रेयसीने शुक्रवारी प्रियकराकडे परत लग्नाचा तगादा लावला. तसेच ती पवनच्या गावात आली आणि ती त्याला शनिवारी दुपारी नेहरू पार्क चौकात भेटली. तिथेच तिने पवनला लग्नासाठी तगादा लावला. त्याने तिला परत तेच सांगितले तरीही ती ऐकत नव्हती. तिने स्वत:जवळील पाण्याची शिशी काढली. त्यात असलेले विष प्राशन केले. हा प्रकार पाहून त्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. या युवतीवर रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा रविवारी मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास खदान पोलीस करीत आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी