जुगार अड्ड्यावर छापा; दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 12:58 IST2018-11-20T12:57:50+5:302018-11-20T12:58:09+5:30

अकोला: सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Gambling raid; Two lakh worth of money seized | जुगार अड्ड्यावर छापा; दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

जुगार अड्ड्यावर छापा; दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

अकोला: सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यावरून सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगार अड्डे फोफावल्याचे सिद्ध झाले आहे.
सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशोक सीताराम इचे, रमेश सीताराम हेडा, अजय श्रीकृष्णा इचे, मधुकर भाऊराव घाटगे हे चार जण मोठ्या प्रमाणात जुगार अड्डा चालवित असल्याची माहिती सिटी कोतवालीचे ठाणेदार विलास पाटील यांना मिळाली. त्यांच्या पथकाने सदर जुगार अड्ड्यावर छापा टाकून चार जुगारींना ताब्यात घेउन त्यांच्याकडून २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या चार जुगारींकडून १ हजार ३९० रुपये रोख, १ हजार ९०० रुपयांचे २ मोबाइल तसेच २ लाख रुपये किमतीचा एम एच ४३ ए ०८४९ क्रमांकाचा मेटॅडोर जप्त करण्यात आला आहे.

 

Web Title: Gambling raid; Two lakh worth of money seized