अमेरिकेत रंगला गजानन महाराजांचा पालखी सोहळा

By Admin | Updated: September 9, 2014 21:26 IST2014-09-09T21:25:28+5:302014-09-09T21:26:02+5:30

संत गजानन महाराजांच्या भक्तीचा महिमा सातासमुद्रापार.

Gajanan Maharaj's palanquin ceremony in Rangoon in America | अमेरिकेत रंगला गजानन महाराजांचा पालखी सोहळा

अमेरिकेत रंगला गजानन महाराजांचा पालखी सोहळा

राजेश शेगोकार / बुलडाणा
विदर्भाचा पंढरीनाथ संत गजानन महाराजांच्या भक्तीचा महिमा सातासमुद्रापार पोहोचला असून, अमेरिकेत महाराजांचा पहिला पालखी सोहळा भारतीय वेळेनुसार ७ सप्टेंबर रोजी अतिशय भक्तीपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
गजानन महाराज अमेरिका परिवाराच्यावतीने या पालखी सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले होते. अमेरिकेतील इर्वीन, कॅलिफोर्निया येथे आयोजित या सोहळय़ामध्ये अमेरिकेत स्थायिक असलेल्या महाराजांच्या १२५ भक्तांनी सहभाग घेतला. पालखी सोहळय़ास प्रारंभ करण्यापूर्वी गणपती अथर्वशीर्षसह पादुकांचे पूजन करण्यात आले. पालखीची परिक्रमा झाल्यानंतर महाआरती व महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. भक्तीचा प्रसार व्हावा, हाच या परिवाराचा निर्मळ उद्देश असल्याने अमेरिकेतील हा पहिला पालखी सोहळा देशभरातील भक्तांसाठीही प्ररेणादायी असाच ठरला आहे.

** अशी आहे पालखी
अमेरिकेत निघालेल्या पहिल्या पालखी सोहळय़ासाठी वापरण्यात आलेली लाकडाची पालखी भारतातच तयार करण्यात आली आहे. या पालखीमध्ये गजानन विजय गं्रथ व पादुका ठेवण्यात आल्या. पालखी सोहळय़ात भगवी पताका, पालखीसोबतचा चांदीचा राजदंड व पालखीवर नक्षीदार छत्र आणि अंबरही होते. या परिक्रमेची अमेरिकेतील नागरिकांमध्येही उत्सुकता होती.

**असा आहे अमेरिका परिवार
गजानन महाराज अमेरिका परिवार या नावाने ओळखल्या जाणार्‍या या परिवाराची स्वतंत्र वेबसाईट आहे. दर महिन्याला गजानन महाराज नामजप सोहळा इंग्लंडमधील संदरलॅन्ड, अमेरिकेतील साऊथ फ्लोरिडा, लॉस एंजेलिस, सन फ्रान्सिस्को आदी ठिकाणी आयोजित केला जातो. प्रत्येक ठिकाणी किमान ४0 पेक्षा जास्त भक्त सहभागी होतात. यासोबतच वेबकॉन्फरन्सिंगमार्फत संपूर्ण जगभरातून महाराजांचे भक्त या परिवाराशी ह्यकनेक्टह्ण आहेत.

Web Title: Gajanan Maharaj's palanquin ceremony in Rangoon in America