शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
Narendra Modi : "माझ्याकडे ना सायकल, ना घर; जेएमएम, काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचारातून अमाप संपत्ती जमवली"
3
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
4
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
5
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
6
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
7
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
8
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
9
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
10
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
11
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
12
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
13
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
14
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
15
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
16
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
17
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
18
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
19
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
20
Swami Samartha: स्वामींना आवडणारी 'ही' एकच गोष्ट सोडा; स्वामी सगळं चांगलंच करतील!

आधी फसवेगिरी; आता हवी महानेट प्रकल्पासाठी परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 10:13 AM

मोबाइल कंपनीला राज्य शासनाच्या महानेट प्रकल्पासाठी मनपाच्या परवानगीची गरज भासली आहे.

- आशिष गावंडे लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शहरात अनधिकृतरीत्या भूमिगत तसेच ओव्हरहेड फायबर आॅप्टिक केबलचे जाळे टाकणाऱ्या मोबाइल कंपन्यांनी महापालिकेसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना अक्षरश: झुलवत ठेवले आहे. आता नेमक्या याच मोबाइल कंपनीला राज्य शासनाच्या महानेट प्रकल्पासाठी मनपाच्या परवानगीची गरज भासली आहे. या प्रकल्पाला जिल्हाधिकारी कार्यालयाने मंजुरी दिली असून, परवानगीसाठी हा प्रस्ताव मनपाकडे सादर केला जाणार आहे. अशा मुजोर कंपनीला आयुक्त संजय कापडणीस परवानगी देतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.शहरातील स्थानिक राजकारण्यांना हाताशी धरून काही बड्या मोबाइल कंपन्यांनी पैशाच्या जोरावर मनमानी कारभार चालविला आहे. मनपा प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता देशातील नामवंत मोबाइल कंपन्यांनी शहराच्या विविध भागात फोर-जी सुविधेच्या नावाखाली अनधिकृत फायबर आॅप्टिक केबलचे भूमिगत तसेच ओव्हरहेड जाळे टाकल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उजेडात आणला. या गंभीर प्रकाराची दखल घेत केंद्रीय राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांनी मोबाइल कंपन्यांच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त करीत संबंधित कंपन्यांवर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश मनपा आयुक्तांना दिले होते. केंद्रीय राज्यमंत्री यांच्या निर्देशानुसार आयुक्तांनी मोबाइल कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची महापालिकेत बैठक आयोजित केली असता, या बैठकीत कंपनीचे अधिकारी दस्तऐवज सादर करू शकले नव्हते. त्यामुळे मनपाने अनधिकृत फायबर आॅप्टिक केबलचे जाळे शोधून काढत ते जप्त करण्याची कारवाई सुरू केली होती. या कारवाईमुळे मोबाइल सेवा विस्कळीत होत असल्याचे पाहून १३ फेब्रुवारी रोजी नागपूर येथे दूरसंचार तथा माहिती व तंत्रज्ञान विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत मोबाइल कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी तसेच आयुक्त संजय कापडणीस यांच्यात बैठक पार पडली होती. त्यानंतर आजपर्यंत कंपन्यांनी मनपाकडे शुल्कापोटी एक छदामही जमा केला नाही. अशा स्थितीमध्ये आता नामवंत मोबाइल कंपनीला महापालिका क्षेत्रात शासनाचा महानेट प्रकल्प राबवायचा आहे. यासाठी कंपनीला मनपाच्या परवानगीची आवश्यकता भासली आहे.राज्य शासनाची दिशाभूलमनपा प्रशासनाला सुमारे ३५ ते ४० कोटी रुपयांचा चुना लावणाºया मोबाइल कंपनीच्या अनधिकृत फायबर आॅप्टिक केबल प्रकरणाची जिल्हा प्रशासनाला संपूर्ण माहिती आहे. अशा स्थितीमध्ये शहरात महानेट प्रकल्पाच्या प्रस्तावाला जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिलीच कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हा प्रशासनाच्या स्तरावरून राज्य शासनाची दिशाभूल केली जात असल्याच्या चर्चा मनपा वर्तुळात आहे.

शहरात महानेट प्रकल्प राबवायचा असेल, तर संबंधित मोबाइल कंपनीने मनपाच्या थकीत रकमेचा भरणा करावा, त्यानंतरच परवानगी दिली जाईल, अन्यथा नाही.- संजय कापडणीस, आयुक्त, मनपा.

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका