शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
3
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
4
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
5
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
6
...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा
7
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...
8
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
9
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
10
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
11
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
12
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
13
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
14
पूर्वेकडचे लोक चिनी, दक्षिणेतील आफ्रिकींसारखे; सॅम पित्रोदा यांचे वादग्रस्त उद्गार; काँग्रेसने घेतला राजीनामा
15
राज्यात लोकसभेनंतर रंगणार शिक्षक, पदवीधर निवडणूक; १० जूनला मतदान, १३ जूनला निकाल
16
महादेव ॲपशी निगडित १ हजार कोटी शेअर्समध्ये? बनावट कंपन्यांद्वारे गुंतवणुकीचा संशय
17
महिनाभरात २२ लाख वाहनांची विक्री; २७ टक्के वाढ;  देशभरातील खरेदीदारांमध्ये प्रचंड उत्साह
18
टेनिस बॉल क्रिकेटमधून शिकलो ‘सुपला शॉट’; सूर्यकुमार यादवने सांगितली आठवण; आपसूक मारला जातो हा फटका
19
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
20
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर

भरधाव ट्रकच्या धडकेत चार वारकरी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 2:04 AM

लोकमत न्यूज नेटवर्कबाळापूर/वाडेगाव : श्री क्षेत्र शेगाव येथे गजानन महाराज यांच्या प्रकट दिन महोत्सवात सहभागी होण्यासाठी वाशिम जिल्हय़ातील उमरा-कापसे येथून शेगाव येथे निघालेल्या भाविकांच्या वाहनास मागून येणार्‍या भरधाव ट्रकने धडक दिली. अकोला जिल्हय़ातील पातूर-बाळापूर मार्गावरील बाघ फाट्यानजीक सोमवार, ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४.१५ वाजता घडलेल्या या अपघातात चार भाविक ठार, ...

ठळक मुद्देशेगावला निघालेल्या वाशिम जिल्हय़ातील वारकर्‍यांवर काळाचा घालामृतांमध्ये तीन पुरुष, एक महिला

लोकमत न्यूज नेटवर्कबाळापूर/वाडेगाव : श्री क्षेत्र शेगाव येथे गजानन महाराज यांच्या प्रकट दिन महोत्सवात सहभागी होण्यासाठी वाशिम जिल्हय़ातील उमरा-कापसे येथून शेगाव येथे निघालेल्या भाविकांच्या वाहनास मागून येणार्‍या भरधाव ट्रकने धडक दिली. अकोला जिल्हय़ातील पातूर-बाळापूर मार्गावरील बाघ फाट्यानजीक सोमवार, ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४.१५ वाजता घडलेल्या या अपघातात चार भाविक ठार, तर सहा गंभीर जखमी झाले. मृतकांमध्ये तीन पुरुष व एका महिलेचा समावेश आहे.संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी वाशिम जिल्हय़ातील उमरा कापसे या गावातील १७0 भाविकांची पायदळ दिंडी शेगाव येथे जाण्यासाठी १ फेब्रुवारी रोजी निघाली. या दिंडीसोबत एक मालवाहू (क्रमांक - एम. एच. ३७ बी. ३६८ ) वाहनही होते. या मालवाहू वाहनात ४ वारकरी बसलेले होते. दिंडी सोमवार, ५ फेब्रुवारी रोजी ही अकोला जिल्हय़ातील पातूर-बाळापूर मार्गावरील बाघ फाट्यावर काही काळ विसाव्या साठी थांबली होती. यावेळी मागून आलेल्या ट्रकने (क्रमांक आर. जे. १३ जी. सी. 0७८२) पायदळ दिंडीसोबत असलेल्या या मालवाहू वाहनास धडक दिली. धडक दिल्यामुळे भाविकांचे वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन उलटले; परंतु वाहनातील चारही वारकरी रस्त्यावरच पडले. धडक दिल्याने अनियंत्रित झालेला ट्रक रस्त्यावर पडलेल्या या वारकर्‍यांच्या अंगावर उलटला. ट्रकमधील सरकीच्या पोत्यांखाली हे वारकरी दबल्याने चार भाविक जागीच ठार झाले, तर मालवाहु वाहनाजवळ विसावा घेत असलेले सहा भाविकही या अपघातात जखमी झाले. मृतकांमध्ये काशीनाथ चंद्रभान कापसे, रमेश धनाजी कापसे, लीला कापसे, रामजी काकडे (सर्व रा. उमरा-कापसे) यांचा समावेश आहे. जखमींमध्ये बळीराम कापसे (६२), शारदाबाई काशीनाथ कापसे (५0), किसनबाई साबळे (६0), वैष्णवी रमेश कापसे (१८), स्नेहल दिलीप कापसे (११), निकीता विठ्ठल कापसे (१३) यांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच वाडेगाव येथील ग्रामस्थांनी घटनास्थळावर धाव घेऊन दबलेल्या भाविकांना बाहेर काढले. बाळापूर पोलिसांनीही घटनास्थळाला भेट देऊन जखमींना उपचारासाठी हलविले.

टॅग्स :AccidentअपघातBalapurबाळापूरwashimवाशिम