दिवसभरात चौघांचा मृत्यू; ६२ नवे पॉझिटिव्ह, १९१ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 06:23 PM2020-09-25T18:23:05+5:302020-09-25T18:23:21+5:30

शुक्रवार २५ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात आणखी चार कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा २२१ वर गेला.

Four deaths during the day; 62 new positives, 191 corona free |  दिवसभरात चौघांचा मृत्यू; ६२ नवे पॉझिटिव्ह, १९१ कोरोनामुक्त

 दिवसभरात चौघांचा मृत्यू; ६२ नवे पॉझिटिव्ह, १९१ कोरोनामुक्त

Next

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून , शुक्रवार २५ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात आणखी चार कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा २२१ वर गेला. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ६२ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ७००४ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शुक्रवारी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांचे ३०४ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ६२ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २४२ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील सहा, मुर्तिजापूर येथील पाच, डाबकी रोड, कौलखेड, अकोट येथील प्रत्येकी तीन्, सिरसो ता.मुर्तिजापूर, चोहट्टा बाजार, जऊळका येथील प्रत्येकी दोन, लहान उमरी, वाशिम बायपास, न्यु खेतान नगर, मोठी उमरी, जूने शहर, गोकूल कॉलनी, तापडीया नगर, सिंधी कॅम्प, अकोली जहागीर, बोर्डी ता. अकोट व करोडी येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये बार्शीटाकळी व आदर्श कॉलनी येथील प्रत्येकी चार, चिंचोली रुद्रायणी, मुर्तिजापूर व एलआयसी क्वॉर्टर येथील प्रत्येकी दोन, पळसो-बढे, सोनखेड, वानखडे नगर, बोरगाव मंजू, चांदूर, रामनगर, सिंधी कॅम्प, तापडीया नगर, वाशिम बायपास, उमरी व फिटे प्लॉट येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.

एक पुरुष, तीन महिलांचा मृत्यू
शुक्रवारी आणखी चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये वाशिम बायपास येथील ७५ वर्षीय महिला, मुर्तिजापूर येथील ४० वर्षीय पुरुष, पाथर्डी ता. तेल्हारा येथील ७० वर्षीय महिला व डाबकी रोड, अकोला येथील ५० वर्षीय महिला या चौघांचा समावेश आहे.

१९१ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून ५९, कोविड केअर सेंटर, अकोला येथून सहा, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन, ओझोन हॉस्पीटल येथून एक, युनिक हॉस्पीटल येथून चार, आयुर्वेदीक महाविद्यालय येथून एक, हॉटेल रिजेन्सी येथून चार व कोविड केअर सेंटर, बाळापूर येथून चार जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तसेच होम क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झाला अशा ११० जणांना अशा एकूण १९१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

१,४४८ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७,००४ लोकांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ५३३५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २२१ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १,४४८ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: Four deaths during the day; 62 new positives, 191 corona free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.