शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
2
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
3
भाजप नेत्यांनी ५० गाड्यांच्या ताफ्यासह भोपाळला काढली रॅली, PM मोदींचं आवाहन नेते दुसऱ्याच दिवशी विसरले!
4
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
5
'या' Infra कंपन्यांची लागली लॉटरी! ११ हजार कोटींचा प्रोजेक्ट मिळताच स्टॉक सुस्साट, हाती आला रेल्वे-हायवेचा प्रोजेक्ट
6
Mumbai Crime: ब्युटीशियन मनाली यांची अंबोलीत हत्या; अवघ्या दोन तासांत मित्रास घाटकोपरमध्ये केले अटक
7
संध्याकाळपर्यंत कुणी ओळखत नव्हता, एका रात्रीत बनला हीरो, कोण आहे माधव तिवारी?  
8
Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
9
पुण्याच्या स्वप्नालीने वडिलांना व्हिडीओ कॉल केला अन्...; मुंबईतील वरळीमध्ये घडली हादरवून टाकणारी घटना
10
'I Love You'ला टाकलं मागे! गुगल ट्रान्सलेटवर २० वर्षांत 'या' शब्दाचा झाला सर्वाधिक वापर
11
शेअर असावा तर असा! 'ही' कंपनी गुंतवणूकदारांना प्रत्येक स्टॉकवर देणार ₹६५६ चा लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
12
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
Numerology: कोणत्या दिवशी नवीन काम सुरू करावं? जन्मतारखेनुसार जाणून घ्या तुमचा 'शुभ वार'
14
मध्य रेल्वेच्या ८४८ मोटरमनवर कामाच्या ओझ्यापेक्षा नियमांचाच अधिक ताण; कर्मचारी उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या व्याधींनी त्रस्त
15
'पंतप्रधानांच्या घोषणेने देशात अस्वस्थता, सर्वपक्षीय बैठक तातडीने बोलवा'; शरद पवारांची प्रतिक्रिया
16
पाकिस्तानचा डबल गेम! अमेरिकेच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी इराणच्या विमानांना दिला आश्रय
17
Naivedya Ritual:देवाला नैवेद्य अर्पण करताना तुळशीपत्र का ठेवतात? तंत्रसार ग्रंथात मिळते 'हे' उत्तर!
18
कोयता सोडून धरली औषधपेटी! ऊसतोड महिला आता फडावरच्या ‘डॉक्टर मॅडम’; बीड पॅटर्नचा राज्याला आदर्श 
19
Tamil Nadu Politics: अण्णा द्रमुकमध्ये फूट, षण्मुगम गटाने TVK ला दिला पाठिंबा, तामिळनाडूत मोठी उलथापालथ
20
हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना
Daily Top 2Weekly Top 5

नाफेडकडे शेतकर्‍यांचे अडकले चार कोटी

By admin | Updated: July 20, 2014 01:59 IST

तुरीच्या चुकार्‍यापोटी बुलडाणा जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे नाफेडकडे सुमारे ४ कोटी रुपये अडकून पडले आहे.

बुलडाणा : तुरीच्या चुकार्‍यापोटी बुलडाणा जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे नाफेडकडे सुमारे ४ कोटी रुपये अडकून पडले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील शेतकर्‍यांकडून नाफेडने ९६ लाख ७५५.२0 क्विंटल तुरीची खरेदी केली होती.
मागील खरीप हंगाम सर्वच शेतकर्‍यांना लाभदायी ठरला. अगदी वेळेवर म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यातच पावसाला सुरुवात झाल्याने शेतकर्‍यांनी पेरणीही वेळेवर केली. त्यानंतर झालेल्या पाऊस समाधानकारक व पुरेसा झाल्याने खरिपाची सर्वच पिके चांगली आली. सोयाबीन, कपाशी, उडीद मूग त्याबरोबरच तूर पिकांना चांगली झडती पडली. कधी नव्हे मागील हंगामात जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी तुरीचा पेरा मोठय़ा प्रमाणावर केल्याने व पाऊसही चांगला झाल्याने तुरीच्या पिकाला कमालीची झडती पडली. त्यामुळे तुरीनेसुद्धा शेतकर्‍यांना चांगलाच हातभार लावला होता. तुरीचे उत्पादन बर्‍यापैकी झाल्याने साहजिकच व्यापार्‍यांनी तुरीचे भाव पाडले. त्यामुळे शेतकर्‍यांना अल्पदरात विक्री करावी लागली.
मात्र नाफेडने तुरीला प्रती क्विंटल ४,३00 रुपये हमी भाव जाहीर केल्याने शेतकर्‍यांनी आपला माल नाफेडला दिला. बुलडाणा जिल्ह्यातील जवळपास ९६ लाख ७५५.२0 क्विंटल तूर नाफेडने खरेदी केली. त्यापोटी ४१ कोटी ६0 लाख ४३ हजार ३६0 रुपये शेतकर्‍यांना देणे असताना आतापर्यंत ३६ कोटी ६९ हजार रुपयांचे चुकारे शेतकर्‍यांना केले. म्हणजे जवळपास ९0 टक्के चुकारे शेतकर्‍यांच्या झाले असले तरी आजही नाफेडकडे ४ कोटी ९६ लाख रुपयांचे पेमेंट देणे बाकी आहे.

*शेतकरी आर्थिक अडचणीत
चालू हंगामात पावसाने हुलकावणी दिली. तब्बल दीड महिना उलटूनही पाऊस नसल्यामुळे अद्याप पेरण्या झाल्या नाहीत. ज्या भागात शेतकर्‍यांनी धूळपेरणी केली तेथे आता दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. अशातच जिल्हा बँक डबघाईस आल्याने यावर्षी जिल्ह्यातील शेतकर्‍यांना पीक कर्जही मिळू शकले नाही. त्यामुळे आहे त्या परिस्थितीत शेतकर्‍यांना तडजोड करून पेरणीसाठी पैसा लावून ठेवावा लागला; मात्र सर्वच शेतकर्‍यांची परिस्थिती सारखी नाही. आलेल्या पिकावरच दुसर्‍या वर्षीच्या पेरणीचे नियोजन करावे लागत असल्याने अजूनही शेतकर्‍यांकडे पेरणीसाठी पैसा नाही. त्यामुळे नाफेडकडून तुरीचे चुकारे न झालेले शेतकरी अर्थिक डबघाईस आलेले आहेत. ज्या शेतकर्‍यांनी सुरुवातीलाच नाफेडला तूर दिली त्यांचे चुकारे आले; पण उशिरा माल दिलेल्या शेतकर्‍यांना अद्यापही त्यांचा पैसा मिळाला नाही. हा पैसा लवकर मिळावा म्हणजे यावर्षीच्या हंगामातील पेरणीचे व इतर खर्चाचे नियोजन होईल, ही अपेक्षा शेतकर्‍यांना आहे.