शहरं
Join us  
Trending Stories
1
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
2
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
3
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
4
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
5
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
6
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
7
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
8
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
9
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
10
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
11
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
12
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
13
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
14
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
15
Hardik-Natasa Divorce : हार्दिक पांड्याबरोबरच्या घटस्फोटाच्या चर्चांवर नताशाने दोन शब्दात दिलं उत्तर, म्हणाली...
16
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
17
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
18
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
19
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
20
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल

बोगस कागदपत्रांद्वारे जामीन; पातुरात आरोपींची चौकशी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 2:04 AM

भिवंडी न्यायालयात बोगस कागदपत्रांद्वारे जामीन मिळवून देण्यासाठी आलेल्या पाच जणांच्या मुसक्या भिवंडीतील शांतीनगर पोलिसांनी १७ नोव्हेंबरला आवळून अटक केली. त्यांना न्यायालयाने २७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली. पातूर तालुक्यातील दोन आरोपींना भिवंडी पोलिसांनी चौकशीसाठी २१ नोव्हेंबर रोजी पातूर येथे आणून त्यांची दोन दिवसपर्यंत चौकशी करण्यात आली.

ठळक मुद्देभिवंडी पोलिसांची कारवाई दोन आरोपी पातूरचे!

लोकमत न्यूज नेटवर्कपातूर : भिवंडी न्यायालयात बोगस कागदपत्रांद्वारे जामीन मिळवून देण्यासाठी आलेल्या पाच जणांच्या मुसक्या भिवंडीतील शांतीनगर पोलिसांनी १७ नोव्हेंबरला आवळून अटक केली. त्यांना न्यायालयाने २७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली. या पाच आरोपींमध्ये वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील तीन तर अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील दोन आरोपींचा समावेश असून, यापैकी पातूर तालुक्यातील दोन आरोपींना भिवंडी पोलिसांनी चौकशीसाठी २१ नोव्हेंबर रोजी पातूर येथे आणून त्यांची दोन दिवसपर्यंत चौकशी करण्यात आली.बोगस कागदपत्रांद्वारे गुन्हेगारांना जामीन मिळवून देण्यासाठी १६ नोव्हेंबर रोजी दुपारी भिवंडी न्यायालयात एक टोळी येणार असल्याची माहिती भिवंडीतील शांतीनगर पोलीस स्टेशनचे विशेष तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीपान सोनावणे यांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिवाजी अंकलेकर, समीर तडवी, पोलीस नाईक तुषार वडे, सुशिला इथापे, पोलीस शिपाई किरण मोहिते, श्रीकांत पाटील, नरेंद्र पाटील यांच्या पथकाने न्यायालयाच्या आवारात पाळत ठेवली. त्याचवेळेस त्यांना काही व्यक्ती संशयास्पद हालचाली करीत असल्याचे वाटल्याने त्यांनी त्यांना तातडीने ताब्यात घेतले. न्यायालयाच्या आवारातील पोलीस चौकीत नेऊन कसून चौकशी केली असता, त्यांच्याकडे असंख्य संशयास्पद शिधापत्रिका, आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्रे, तहसीलदारांकडील सही, शिक्का असलेल्या कोर्‍या शिधावाटप पत्रिका, सातबाराचे उतारे व जमिनीच्या आधारे मिळविलेला ऐपत दाखल आदी बोगस कागदपत्रे आढळून आली. याप्रकरणी आरोपी अब्दुल्ला नासीर रशीद कादर शेख (५५) रा.पातूर , सय्यद रशीद सय्यद रज्जाक (४५) रा. पातूर , तसेच दिनकर देवराम भिसे, चिंतामण नवृत्ती सरकटे व श्रीराम फकिरा सावळे तिघेही रा. अमाना ता.मालेगाव, जि.वाशिम यांना १७ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी अटक केली. त्यांना भिवंडी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने २७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली. या घटनेबाबत शांतीनगर पोलीस स्टेशनमध्ये पाचही आरोपींविरुद्ध भादंविच्या ४२0,४६८, ४७१, २0१ व ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी पातूर येथील रहिवासी असलेल्या अब्दुल्ला नासीर रशीद कादर शेख  व सय्यद रशीद सय्यद रज्जाक या दोन आरोपींना शांतीनगर पोलिसांनी २१ नोव्हेंबरला पातुरात आणून दोन दिवसांमध्ये तहसील कार्यालयात नेऊन तहसीलदारांमार्फत बोगस कागदपत्रांची तपासणी केली. त्यात सर्व कागदपत्रे बोगस असल्याचे निष्पन्न झाले.  या प्रकरणात भिवंडीतील दोन वकील मदत करीत असल्याची बाब उघडकीस आल्यामुळे त्यांच्या विरोधातसुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना २५ नोव्हेंबरपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, या टोळीतील एक महिला आरोपी फरार झाली आहे. या प्रकरणात पातुरातील दोन आरोपींचा समावेश असल्यामुळे पातूर शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणCrimeगुन्हा