शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

सरसकट कर्जमाफीचा ठराव

By admin | Updated: June 15, 2017 01:31 IST

जि.प. सर्वसाधारण सभा : शैक्षणिक व पीक कर्जमाफ कराच!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शेतीवर असलेले पीक, शेती यांत्रिकीकरण आणि शैक्षणिक उद्देशासाठी घेतलेले कर्ज माफ व्हावे, तसेच नवीन कर्ज वाटपासाठी शेतकऱ्यांच्या खात्यात किमान ५० हजार रुपये जमा करावे, यासह विविध मागण्यांचा ठराव बुधवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. शेतकरी जागर मंचच्यावतीने जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे यांना दिलेल्या निवेदनानुसार सदस्या प्रतिभा अवचार यांनी हा ठराव सभागृहात मांडला. सर्वसाधारण सभेत इतरही ठरावासोबत निवेदनातील संपूर्ण मुद्यांचा ठराव मंजूर करत तो प्रशासनाकडून राज्य शासनाला पाठवण्याचे सांगण्यात आले. त्यामध्ये शेतकऱ्यांनी सरसकट शेतीसाठी घेतलेले कर्ज माफ करावे. त्यामध्ये पीक कर्ज, शेती अवजारे, यंत्र सामग्री, ट्रॅक्टर व इतर कर्ज, पाइपलाइन, मोटर, स्प्रिंकलर किंवा ठिबक, विहीर, शेततळे, सिंचनाच्या सोयीसाठी घेतलेली सर्व प्रकारची कर्जे माफ करावी, त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक, राष्ट्रीयीकृत बँक, खासगी बँक, पतसंस्था, एनबीएफसी, अधिकृत सावकारी कर्जाचा समावेश असावा, खारपाणपट्ट्यातील सर्वच गावांचा त्यामध्ये समावेश झालाच पाहिजे. २०१७ पर्यंत थकलेले सर्व कर्ज, नियमित असलेल्या शेतकऱ्यांना पतपुरवठा किमान ५० टक्के वाढवून देणे, कर्ज माफीचा आदेश २१ जूनपूर्वी द्यावा, नवीन कर्ज वाटपासाठी किमान ५० हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे, सोने तारण कर्जासाठी कार्यक्षेत्राची अट ठेवू नये, शेतीवर असलेले शैक्षणिक कर्ज, उच्च शिक्षणाचे तसेच वैद्यकीय खर्चासाठी घेतलेले संपूर्ण कर्ज माफ करावे, या मागण्या आहेत. या कर्जमाफीला विरोधशेतकरी जागर मंचाने दिलेल्या निवेदनात कर्ज माफीच्या मागणीसोबत काही बाबीला विरोधही केला आहे. त्यामध्ये सरकारी नोकरदार शेतकरी, घरबांधणीसाठी शेतीवर घेतलेले कर्ज, व्यावसायिक किंवा वैयक्तिक वाहन खरेदीसाठी घेतलेले कर्ज माफ करू नये, असेही ठरावात नमूद करण्यात आले.