बिअर बार फोडणारे पाच आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 10:38 AM2020-04-27T10:38:49+5:302020-04-27T10:38:58+5:30

त्यांच्याजवळून चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Five accused of breaking beer bar arrested | बिअर बार फोडणारे पाच आरोपी जेरबंद

बिअर बार फोडणारे पाच आरोपी जेरबंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोट : कोरोना संकटामुळे सुरू असलेल्या लॉकडाउनचा गैरफायदा घेत अकोट शहरातील बिअर बार फोडून चोरी करणाऱ्या पाच आरोपींना अकोट शहर पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याजवळून चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अकोट-हिवरखेड मार्गावर ड्रीम लॅण्ड वाइन बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंट आहे. लॉकडाउन असताना अज्ञात चोरट्यांनी शटर फोडून बारमधील विविध कंपन्यांची ७९ हजारांची दारू लंपास केली. तसेच बारमध्ये लावलेले सीसी कॅमेरे, एलईडी टीव्ही, एलसीडी, संगणक संच, सीसी रेकॉर्डर असा एकूण १ लाख १८ हजारांचा मुद्देमाल २१ एप्रिल रोजी चोरीला गेल्याचे उघड झाले होते. या प्रकरणी अकोट शहर पोलीस स्टेशनमध्ये नंदकिशोर जांभुळकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले.
नाकाबंदी व लॉकडाउनमुळे चोरीचा मोठ्या शिताफीने शोध घेतला असता आरोपी निष्पन्न केले. यावेळी कसून चौकशी करून आरोपी अजय नागोराव वैद्य, गोवर्धन गणेश हरमकर, दिनेश ईश्वरसिंग ठाकूर, गणेश तुळशीदास काळमेघ, तिलक कन्हैय्यालाल अहीर यांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या मुद्देमालापैकी ४७ हजार ८३६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोनवणे, पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रणजितसिंह ठाकूर, संजय घायल, सुलतान पठाण, गोपाल अघडते, राकेश राठी, विजय सोळंके, विठ्ठल चव्हाण यांनी केली.
फोटो आहे

Web Title: Five accused of breaking beer bar arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.