शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
3
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
4
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
5
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
6
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
7
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
8
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
9
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
10
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
11
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
12
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
13
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
14
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
15
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
16
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
17
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
18
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
19
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
20
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
Daily Top 2Weekly Top 5

ग्रे प्लवरची विदर्भात प्रथमच नोंद

By admin | Updated: February 4, 2015 01:46 IST

वेक्सच्या अभ्यासकांनी घेतली नोंद.

विवेक चांदूरकर / अकोला:केवळ समुद्र किनार्‍यावरच आढळणारा, युरोपीय देशातून स्थलांतरीत दुर्मिळ ग्रे प्लवर पक्षी विदर्भात प्रथमच निदर्शनास आला आहे. यासोबतच ज्ॉक स्नाईप व डनलीन या दुर्मिळ पक्ष्यांच्याही नोंदी विदर्भात वाईल्डलाईफ अँन्ड एन्व्हायर्नमेंट कंझर्व्हेशन सोसायटीच्या (वेक्स) अभ्यासकांनी रविवारी पक्षी निरक्षणादरम्यान घेतल्या आहेत.वाईल्डलाईफ अँन्ड एन्व्हायर्नमेंट कंझरर्व्हेशन सोसायटी (वेक्स) सध्या संपूर्ण विदर्भात स्थलांतरीत पक्ष्यांचा अभ्यास करून, त्यांच्या नोंदी करीत आहे. हिवाळी पाणपक्षी अभ्यासादरम्यान अकोला परिसरामध्ये ग्रे प्लवर व ज्ॉक स्नाईप या दुर्मिळ पक्ष्यांच्या नोंदी संस्थेचे पक्षी अभ्यासक शिशिर शेंडोकार, किरण मोरे व निनाद अभंग यांनी घेतल्या आहेत. हे पक्षी सध्या शहरालगतच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसर व दगडपारवा तलावावर वास्तव्यास आले आहेत. ग्रे प्लवर या पक्ष्याचे शास्त्रीय नाव प्लूवीएलीस स्क्वाटारोला असून, चिखलपक्षी अर्थात वेडर्स प्रकारातील हा पक्षी हिवाळ्यात युरोपमधून स्थलांतर करून भारताच्या समुद्र किनार्‍यावर व बेटांवर येतो. भारताच्या भुभागावर या पक्ष्याच्या नोंदी क्वचितच मोठय़ा नद्यांवर होत असतात. या पक्ष्याला गोल्डन प्लवरपासून वेगळा ओळखणे कठीण असून, तासनतास निरीक्षण व त्याच्या सवयीवरून दगडपारवा तलावावर त्याची ओळख पटविण्यात यश आले आहे. हा पक्षी महाराष्ट्राच्या समुद्र किनार्‍यावर स्थलांतर करून दरवर्षी येतो; परंतु उर्वरित महाराष्ट्रामध्ये त्याची नोंद झाली नसल्याने यावेळी झालेली नोंद ही विदर्भातील पहिलीच असल्याची माहिती वेक्सचे सचिव तथा मानद वन्यजीव रक्षक डॉ. जयंत वडतकर यांनी दिली. ज्ॉक स्नाईप हा एक छोटासा, पाणवनस्पतींमध्ये राहणारा व इतर स्नाईप पक्षांपासून वेगळी ओळख असलेला आणखी एक दुर्मिळ पक्षी आहे. आकाराने इतर स्नाईपपेक्षा छोटा व आखूड चोच आदींवरून या पक्ष्याला ओळखावे लागते.