शहरं
Join us  
Trending Stories
1
१९७१ च्या युद्वावेळी भारतानं संधी गमावली?; करतारपूर साहिब उल्लेख करत मोदींचा मोठा डाव
2
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
3
बिल्डर 'बाळा'चा गरीब ड्रायव्हरला अडकविण्याचा प्रयत्न; म्हणतोय, मी नाही तो गाडी चालवत होता...
4
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
5
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
6
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
7
Gold Silver Rates Today : सोन्या-चांदीच्या दरात अचानक मोठी घसरण? पटापट चेक करा आजचे दर
8
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर
9
बांग्लादेशी खासदाराला हनीट्रॅपमध्ये अडकवणारी महिला अटकेत; मुंबई कनेक्शनही समोर
10
Sunrisers Hyderabad Predicted XI, IPL 2024 SRH vs RR: पराभवातून धडा घेत SRH संघात करणार एक महत्त्वाचा बदल; अनुभवी स्टार खेळाडूची होणार 'एन्ट्री'
11
दीपिकाचा प्रेग्नंसी ग्लो! हिरव्या वनपीसमध्ये दिसतेय खूपच सुंदर; Video व्हायरल
12
Arvind Kejriwal : "मला किती दिवस जेलमध्ये ठेवायचं याचं उत्तर फक्त पंतप्रधानच देऊ शकतात"
13
Sankashti Chaturthi 2024: गणपतीची आरती झाल्यावर आपण जे कवन म्हणतो, ते कुठून आलं? वाचा!
14
घटस्फोटित पती-पत्नीच आमनेसामने, काय होणार?
15
'अबकी बार ४०० पार' कुठल्या भरवशावर?; मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं लॉजिक
16
PK यांचा नवा दावा! जर मोदी सत्तेत आले तर १०० दिवसांत 'हा' मोठा निर्णय होऊ शकतो
17
पंतप्रधान मोदींना भेटून गोविंदाने सांगितली 'मन की बात', म्हणाला - "हा माझ्यासाठी सन्मान.."
18
शेजारी देशांमध्ये शंभरावर मृत्यू, राजस्थानात पारा ४८.८ अंशांवर; एकाच दिवसात पाच जण दगावले
19
'सिंघम ३'च्या सेटवरुन अजय देवगणचा फर्स्ट लूक समोर, जम्मू-काश्मीरमध्ये शूटिंग करतोय बाजीराव सिंघम
20
“काँग्रेस संपली, आता कुठे दिसणार नाही”; असं खरगे खरंच म्हणाले? वाचा, व्हायरल व्हिडिओचं सत्य!

मनपा विद्यार्थ्यांना देणार प्रथमोपचार पेटी; मुख्याध्यापकांना वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2020 2:29 PM

सभापती मनीषा भन्साली यांनी मनपाच्या सर्व ३३ शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रथमोपचार पेटी देण्यासाठी पुढाकार घेतला.

अकोला : महापालिकेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती मनीषा भन्साली यांच्या कल्पकतेतून मनपा शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी सोमवारी प्रथमोपचार पेटीचे वितरण करण्यात आले. महापौर अर्चना मसने, सभापती मनीषा भन्साली यांच्या हस्ते शाळेतील सर्व माध्यमांच्या मुख्याध्यापकांकडे सदर पेट्या हस्तांतरित करण्यात आल्या.शाळांमधील चिमुकले विद्यार्थी म्हणजे थोड्याफार प्रमाणात दंगामस्ती, मैदानी खेळ ओघाने आलेच. अशा खेळण्या-बागडण्याच्या वयात थोडेफार खरचटणे, किरकोळ दुखापती होत राहतात. त्यावर वेळीच प्रथमोपचार होणे गरजेचे आहे. ही बाब हेरत महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती मनीषा भन्साली यांनी मनपाच्या सर्व ३३ शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रथमोपचार पेटी देण्यासाठी पुढाकार घेतला. त्यासंदर्भात प्रशासनासोबत सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यात आला. सोमवारी मनपाच्या स्थायी समिती सभागृहात मनपाच्या ३३ शाळेतील मुख्याध्यापकांना प्रथमोपचार पेटीचे वितरण करण्यात आले. यावेळी महापौर अर्चना मसने, स्थायी समिती सभापती विनोद मापारी, महिला व बाल कल्याण समिती सभापती मनीषा भन्साली, महिला व बाल कल्याण समिती सदस्य अनुराधा नावकार, मंगला सोनोने मनपा उपायुक्त रंजना गगे, शिक्षणाधिकारी डॉ. शाहीन सुलताना आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक नंदिनी दामोदर यांनी, तर संचालन गजेंद्र ढवळे यांनी केले. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका