शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

मुर्तिजापुरात जिनिंग फॅक्टरीला आग

By admin | Updated: December 25, 2014 00:55 IST

नऊ लाखांचे नुकसान.

मूर्तिजापूर (अकोला): दर्यापूर मार्गावरील देवाशीष जिनिंग अँड प्रेसिंगला आग लागून कापूस व मशीन जळून खाक झाल्याची घटना बुधवार, २४ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. आगीत तब्बल नऊ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.पुंडलिकनगर परिसरात देवाशीष जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी असून, त्या ठिकाणी व्यंकटेश बेस प्रोसेस कंपनीचा कापूस व मशीन आहेत. बुधवारी या फॅक्टरीला अचानक आग लागली. पाहता -पाहता आगीने उग्र रूप धारण केले. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाने घटनास्थळावर धाव घेतली. अग्निशामक दलाच्या कर्मचार्‍यांनी आग आटोक्यात आणली. आगीत २00 ते २५0 क्विंटल कापूस व मशीन जळून खाक झाल्याची माहिती फॅक्टरीच्या मालकांनी दिली. या आगीमुळे अंदाजे नऊ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशामक दलाचे रवि तिवारी, विजय मोहोड, नारायण खडसे, शेर मुजिब, व्यंकटेश जिनिंगचे जयकिशन डागा, पुरुषोत्तम डागा, साहिल डागा व कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.