शहरं
Join us  
Trending Stories
1
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
2
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
3
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
4
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
5
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
6
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
7
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
8
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
9
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
10
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
11
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
12
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
13
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
14
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
15
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
16
एका कुशीवरुन दुसऱ्या कुशीवर... पण काही केल्या झोपच येईना; 'या' ६ टिप्स गाढ झोपेमागचं रहस्य
17
'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
18
चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना
19
एका शेअरने बदललं गुंतवणूकदारांचे नशीब! १ लाखाची गुंतवणूक ५ वर्षांत झाली ३४ लाखांहून अधिक
20
Travel : परदेशात जायचंय? 'हे' देश आहेत भारतीयांसाठी व्हिसा फ्री, ४० हजारात होईल एका देशाची ट्रिप!

अखेर नोटिफि केशन निघणार!

By admin | Updated: June 17, 2017 01:44 IST

पंदेकृवि कुलगुरू पद : अनेक शास्त्रज्ञ स्पर्धेत!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांचा कार्यकाळ आॅगस्टमध्ये संपणार आहे. या पदासाठीच्या हालचाली सुरू झाल्या असून, राज्यपाल यांनी या निवड प्रक्रियेसाठी समितीचे गठन केले आहे. यासंदर्भातील अधिसूचना (नोटिफिकेशन) अखेर येत्या दोन ते तीन दिवसांत निघणार असल्याचे वृत्त आहे. याकडे सर्व ज्येष्ठ शास्त्रज्ञांचे लक्ष लागले आहे.कृषी विद्यापीठांच्या कुलगुरू पदासाठी अधिसूचनेत काय असेल, यावर सर्व ठरलेले असते. त्यानंतर या पदासाठी कोणाला संधी मिळणार, हे निश्चित होते. या अधिसूचनेत संचालक हा निकष लावल्यात आला, तर राज्यात सध्या एकच संचालक आहे. विभाग प्रमुखांचा निकष लावला तर सात-आठ विभाग प्रमुख आहेत. यामुळे अधिसूचनेची सर्व वरिष्ठ शास्त्रज्ञांना प्रतीक्षा आहे. राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतील वरिष्ठांसह भारतीय कृषी संशोधन परिषद, या परिषदेशी निगडित संस्था, देशातील कृषी संस्था आदींचे वरिष्ठ शास्त्रज्ञही कुलगुरू पदासाठी इच्छुक असतात. या सर्व प्रक्रियेत व्यक्तिगत माहिती (बायोडाटा) कशी आहे, संशोधन, संशोधन पेपर्स, अनुभव व कोणत्या पदावर कसे काम केले, आदींची सूक्ष्म महिती बघितली जाते. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील आजी-माजी वरिष्ठांसह राज्यातील इतर कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञही या स्पर्धेत असल्याचे वृत्त आहे. त्यासाठीच अधिसूचनेकडे या सर्वांचे लक्ष लागले आहे.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू पदाच्या निवडीसाठी राज्यपाल तथा कुलपती विद्यासागर राव यांनी सर्वोच्च न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायाधीश हेमंत गोखले यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू निवड समिती गठित केली आहे. समिती राज्यपालांच्या विचारार्थ कुलगुरूपदासाठी योग्य व्यक्तींच्या नावाची यादी सादर करणार आहे. नोटिफिकेशन निघताच या प्रक्रियेला सुरुवात होईल.