शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

बंदीचा फज्जा; प्लास्टिकचा खुलेआम वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 10:58 IST

सिंगल युज प्लास्टिक’च्या विरोधात सुरू असलेली मोहीम प्रभावी ठरली नसल्याचेच दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. सोबतच जनावरे व मनुष्यांसाठीदेखील अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. परंतु असे असतानादेखील ‘सिंगल युज प्लास्टिक’चा खुलेआम वापर करण्यात येत आहे. राज्य शासनाने मागील वर्षी प्लास्टिकच्या वापरावर बंदी लावली होती. अनेक जागी छापेमारीदेखील झाली. त्यानंतर प्लास्टिकचा उपयोग कमी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र अद्यापही प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरूच आहे. ‘सिंगल युज प्लास्टिक’च्या विरोधात सुरू असलेली मोहीम प्रभावी ठरली नसल्याचेच दिसून येत आहे.बंदीची गरज का?जलवायू परिवर्तन आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे होत असलेला पर्यावरणाचा ºहास जगाच्या दृष्टीने मोठा चिंतेचा विषय आहे. असे असले तरी प्लास्टिकचा वापर एवढा बेसुमार वाढला आहे की, या प्लास्टिकमुळे निर्माण होणारे प्रदूषण थांबविणे आणि वाया जाणाऱ्या प्लास्टिकचे व्यवस्थापन करणे ही जगाच्या दृष्टीनेच मोठी समस्या ठरली आहे.दरवर्षी कितीतरी लाख टन प्लास्टिकची निर्मिती होते. मात्र त्याचे विघटन होत नाही. त्यामुळे सिंगल-यूज प्लास्टिकचा वापर थांबविण्यासाठी जगभरातील देश कडक धोरण ठरवीत आहेत.सिंगल-यूज प्लास्टिक काय आहे? एकदा वापरल्यावर दुसऱ्यांदा वापरात न येणारे अर्थात कचºयाच्या डब्यात जाणाºया प्लास्टिकला सिंगल यूज प्लास्टिक म्हणतात. यालाच डिस्पोजेबल प्लास्टिकही म्हणतात. या प्लास्टिकचा पुनर्वापर करता येतो. याचा वापर बºयाचदा दैनंदिन कामात होतानाही दिसतो. उदा. प्लास्टिक बॅग, प्लास्टिकच्या बाटला, स्ट्रॉ, कप, प्लेट्स, फूड पैकजिंगसाठी वापरले जाणारे कंटेनर, गिफ्ट रॅपर्स आणि कॉफीचे डिस्पोजेबल कप.

प्लास्टिकच आहे कॅन्सरला कारणडिस्पोजेबल उत्पादने आणि पॅकेजिंगसाठी वापरण्यात येणाºया प्लास्टिकचा उपयोग प्रचंड वाढला आहे. परिणामत: प्लास्टिकच्या कचºयाचे ढीगही वाढत आहेत. प्लास्टिकमध्ये असणाºया घातक रसायनामुळे माणसाच्या शरीरात कॅन्सर (कर्करोग) निर्माण होतो. प्लास्टिकमध्ये एन्डोक्राईनशी संबंधित समस्या निर्माण करणारे रसायनही असते, ज्यामुळे लठ्ठपणा आणि मधुमेह यासारखे आजार जडतात. प्लास्टिक जाळल्यावर कार्बन मोनोआॅक्साईड, डायआॅक्सिन, हायड्रोजन सायनाईड यासारखे विषारी वायू वातारवणात पसरतात. त्याचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होतो. प्लास्टिक वजनाला हलके असल्याने कचराकुंडीतून हवेसोबत उडून दुसरीकडे पसरतात. यातून जीवजंतूचा प्रादुर्भाव पसरतो.

टॅग्स :AkolaअकोलाPlastic banप्लॅस्टिक बंदीAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका