अकोला-वाशीम राज्य मार्गावर कारचा भीषण अपघात; पाच जण ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 16:34 IST2024-05-03T16:34:39+5:302024-05-03T16:34:39+5:30

या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून, कारमधील इतर व्यक्ती गंभीर असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून प्राप्त झाली.

Fatal car accident on Akola-Washim state road; Five people were killed | अकोला-वाशीम राज्य मार्गावर कारचा भीषण अपघात; पाच जण ठार

अकोला-वाशीम राज्य मार्गावर कारचा भीषण अपघात; पाच जण ठार

पातूर (जि.अकोला) (देवानंद गहिले) : अकोला-वाशीम राज्य मार्गावर ३ मे रोजी दुपारी पातूर येथील उड्डाणपुलाजवळ दोन कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून, कारमधील इतर व्यक्ती गंभीर असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून प्राप्त झाली. जखमींवर अकोला येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे.

कारमध्ये क्रमांक एम. एच. ३७ वी ५११ ही गाडी वाशीमकडून अकोलाकडे पातूर मार्गाने उड्डाणपुला जवळून अकोल्याकडे जात होती तर विरुद्ध दिशेकडून समोरून कार क्रमांक एम. एच. ३० बीएल ९५५२ ही येत होती. दोन्ही कारमध्ये जोरदार धडक झाली. घटनेची माहिती मिळताच पातूर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक व सहकारी घटनास्थळी पोहोचले. या अपघातात घटनास्थळीच तिघांचा मृत्यू झाला. पोलिसांनी गंभीर जखमींना अकोला रुग्णालयामध्ये पाठविले तर रुग्णालयात नेताना दोघांचा मृत्यू झाला. या घटनेमध्ये वाशीम शहरातील शिवाजी शिक्षण संस्थेचे अरूणराव सरनाईक यांचे कुटुंब असल्याची माहिती आहे. सरनाईक हे त्या गाडीमध्ये नव्हते.

Web Title: Fatal car accident on Akola-Washim state road; Five people were killed