शहरं
Join us  
Trending Stories
1
रुपया ९६ पार! भारतात महागाईचा उडणार डबलबार, अर्थव्यवस्थेवर दबाव; केंद्र सरकारची चिंता वाढली
2
आजचे राशीभविष्य - १६ मे २०२६, मोठा आर्थिक लाभ होणार; नवीन कामे पूर्ण होणार
3
उकाड्यातून लवकरच सुटका होणार! मान्सून वेळेआधीच येणार, २६ मे रोजीच केरळात होणार दाखल
4
मुंबईची कायदा-सुव्यस्था मनोजकुमार शर्मा यांच्याकडे, सत्यनारायण यांच्याकडे वाहतूक, कुंभारेंकडे गुन्हे 
5
अमेरिकेत अदानींना मोठा दिलासा; अदानी कुटुंब १८ दशलक्ष डॉलरचा दंड भरणार
6
निवडणुका संपताच १६ दिवसांतच भाववाढ; पेट्रोल-डिझेल ३ रुपये महाग, पेट्रोल निर्यातीवर टॅक्स 
7
अबुधाबीकडून भारतात ५ अब्ज डॉलर गुंतवणूक; एलपीजी पुरवठाही करणार
8
मनोविकारांवरील उपचारांचे विद्यापीठ हरपले; डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन 
9
Neet Exam Date: ‘नीट’ पुनर्परीक्षा २१ जूनला; पुढील वर्षीपासून ऑनलाइन
10
भगवान महावीरांची १०८ फूट उंच मूर्ती पाटण्यात उभारणार  
11
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
12
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
13
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
14
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
15
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
16
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
17
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
18
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
19
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
20
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकर्‍यांच्या हिताच्या योजना कागदावरच

By admin | Updated: May 16, 2014 20:20 IST

अधिकारी मुख्यालयाला दांडी मारत असल्यामुळे योजनांचा लाभ लाभार्थींपर्यंत पोहचत नाही.

बार्शीटाकळी : गरिबांच्या उन्नतीसाठी केंद्र व राज्य शासनाने विविध योजना अंमलात आणल्या तरी या योजनेचा लाभ मिळविताना लाभार्थींच्या नाकीनऊ येत आहे. कागदपत्रांची जुळवाजुळव व अधिकार्‍यांची असहकार्याची भूमिका सध्या योजनांना सुरूंग लावत आहे. या योजनांचा लाभ शेतकर्‍यांना मिळत नसल्यामुळे शेतकरी दिवसेंदिवस कर्जात बुडत आहेत. शासनाच्या कृषीविषयक योजना राबविणारे अधिकारी बोकाळले असल्यामुळे प्रत्येक योजनेपासून शेतकरी वंचित राहात आहेत. शेतकर्‍यांच्या उत्थानाकरिता, मदतीकरिता आणि मार्गदर्शनाकरिता केंद्र स्तरावर कृषी विभाग, राज्याचा कृषी विभाग, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ठिकाणी कृषी विभाग कार्यरत आहे. या व्यतिरिक्त सेवाभावी संस्थेद्वारे (बँक, संस्था) शेतकर्‍यांना अधिकाधिक लाभ घेता यावा, याकरिता चार दशकांपूर्वीपासून प्रयत्न केले जात आहेत. मात्र शेतकर्‍यांची परिस्थिती सुधारण्याऐवजी दयनीय होत चाललेली आहे. यामुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. शासनाने अनेक योजना लाभार्थींपर्यंत पोहचत नाहीत. अधिकारीसुद्धा याबाबत अनभिज्ञ असतात. त्यामुळे खर्‍या अर्थाने ग्रामपातळीवर जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे. शेतकर्‍यांना शेतीविषयक जाणीव व्हावी, आधुनिक शेतीत सुधारणा व्हावी, शेतकर्‍यांना मार्गदर्शन मिळावे, याकरिता अकोल्यात १९६९ मध्ये कृषी विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. पिकात सुधारणा व्हावी, उत्पन्नात वाढ व्हावी, कमी खर्चात अधिक उत्पादन मिळावे, याकरिता १९७२ मध्ये पीक संशोधन केंद्र उभारण्यात आले. बियाणे तंत्रज्ञान संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आली. मत्स्य संशोधन केंद्राची स्थापना झाली. कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र सुरू करण्यात आले. शेतकरी दिलासा अभियान सुरू करण्यात आले. २00३ मध्ये कृषी तंत्रज्ञान केंद्राची सुरुवात करण्यात आली. या सर्व योजनांवर शासनाचे कोट्यवधी रुपये खर्च झालेत. लाभ मात्र अल्प शेतकर्‍यांच्या पदरात पडला. सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून शेतीविषयक आधुनिक साहित्य व अवजारे, बियाणे, कमी दरात खते, औषधे, यंत्रे पुरविण्यात येत आहेत. मात्र, त्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागतो. लाभार्थींना योजनांची माहिती ज्या अधिकार्‍यांकडून अपेक्षित असते ते अधिकारी मुख्यालयाला दांडी मारत असल्यामुळे योजनांचा लाभ लाभार्थींपर्यंत पोहचत नाही.