शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीनंतरही शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:42 IST

जिल्ह्यात दीड महिन्यात १८ शेतकऱ्यांनी संपविली जीवनयात्रा

संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी शासनाने दीड महिन्यांपूर्वी कर्जमाफीची घोषणा केली, तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणे अद्याप बाकी आहे. कर्जमाफीचा गाजावाजा करण्यात येत असतानाच जिल्ह्यात गत दीड महिन्यांच्या कालावधीत १८ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून जीवनयात्रा संपविली. त्यामुळे कर्जमाफीनंतरही शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबले नसल्याची बाब समोर येत आहे.शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्यात छेडण्यात आलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान, अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची पहिली घोषणा मुख्यमंत्र्यांनी गत ३ जून रोजी केली. त्यानंतर अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासह निकषांच्या आधारे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा गत ११ जून रोजी शासनामार्फत करण्यात आली. या घोषणानंतर १ एप्रिल २०१२ ते ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्यात आल्याचा शासन निर्णय २८ जून रोजी काढण्यात आला. त्यानंतर कर्जमाफी योजनेची व्याप्ती वाढवीत, सन २००९ ते ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा शासनाकडून निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आल्याची घोषणा झाल्यानंतर दीड महिन्यांचा कालावधी उलटून गेला; मात्र प्रत्यक्षात कर्जमाफीचा लाभ अद्यापही थकबाकीदार शेतकऱ्यांना मिळाला नाही. दरम्यान, गत १ जून ते १९ जुलै या कालावधीत जिल्ह्यात १८ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून जीवनयात्रा संपविली. त्यामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आल्याचा गाजावाजा सुरू असला, तरी शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच असल्याची बाब समोर येत आहे.१ जून ते १९ जुलैपर्यंत शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे!१ जून ते १९ जुलै या कालावधीत जिल्ह्यात १८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यामध्ये सुनील महादेव तांबडे (चांदूर), प्रल्हाद तुळशीराम बगले (तुदगाव), रफीकशा मोहंमदशा (वाडेगाव), सुरेश जगदेवराव काळे (वाडेगाव), शंकर शिवदास बुंदे (अनकवाडी), गणेश लक्ष्मण काळबोंडे (उमरा), वासुदेवराव रामकृष्ण थोटे (डोंगरगाव), संदीप विश्वंभर नानोटी (वाडेगाव), अशोक मारोती कळसकार (खंडाळा), मंगेश साहेबराव कापसे (कुटासा), जयप्रकाश उद्धवराव खारोडे (तळेगाव बु.), गजानन वामनराव जाधव (कावसा), भूषण महेंद्र खवले (उमरा), विजय महादेव काळपांडे (दहिगाव), रामदास संपत हिवराळे (तुलंगा), संतोष ओंकार मोकळकर (रौंदळा), श्रीकृष्ण काशीराम खाडे (सुकोडा), विनोद रामकृष्ण कुटे (हाता) इत्यादी १८ शेतकरी आत्महत्या प्रकरणांचा समावेश आहे. कर्जमाफीच्या मार्गदर्शक सूचना केव्हा प्राप्त होणार?थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा शासन निर्णय २८ जून रोजी काढण्यात आला; परंतु त्यानंतर योजनेची व्याप्ती वाढविण्याचा घेण्यात आलेला निर्णय आणि कर्जमाफीसंदर्भात मार्गदर्शक सूचना शासनाकडून अद्यापही संबंधित यंत्रणांना प्राप्त झाल्या नाही. त्यामुळे कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक सूचना केव्हा प्राप्त होणार, याबाबत संबंधित यंत्रणांकडून प्रतीक्षा केली जात आहे.