शेतकरी कुटुंबावर मधमाशांचा हल्ला; एकाचा मृत्यू, तीन गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 13:18 IST2019-03-30T12:30:56+5:302019-03-30T13:18:15+5:30
अकोट (जि. अकोला) : शेतात काम करण्यासाठी गेलेल्या कुटुंबावर मधमाशांनी अचानक केलेल्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला, तर त्यांच्या कुटुंबातील एका चिमुकलीसह तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना अकोट तालुक्यातील उमरा शेतशिवारात शनिवार, ३० मार्च रोजी घडली.

शेतकरी कुटुंबावर मधमाशांचा हल्ला; एकाचा मृत्यू, तीन गंभीर जखमी
अकोट (जि. अकोला) : शेतात काम करण्यासाठी गेलेल्या कुटुंबावर मधमाशांनी अचानक केलेल्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला, तर त्यांच्या कुटुंबातील एका चिमुकलीसह तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना अकोट तालुक्यातील उमरा शेतशिवारात शनिवार, ३० मार्च रोजी घडली. लक्ष्मण प्रल्हाद सुकोसे (५२ वर्षे) असे मृतक शेतकऱ्याचे नाव असून, जखमींना उपचारासाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अकोट तालुक्यातील उमरा येथील शेतकरी लक्ष्मण सुकोसे, पत्नी रेखाबाई सुकोसे, मुलगा संतोष सुकोसे व नात पुजा सुकोसे (२ वर्षे) हे चौघे जण शनिवारी सकाळी स्वत:च्या शेतात गेले होते. शेतात मशागतीचे काम केल्यानंतर दहा ते साडे दहा वाजताचे सुमारास हे कुटुंब शेतातील लिंबाच्या झाडाखाली जेवन करण्यासाठी बसले. जेवन सुरु असतानाच माकडांनी उड्या मारल्यामुळे झाडावरील मधमाशांचे मोहोळ उठले. चवताळलेल्या मधमाशांनी झाडाखाली बसलेल्या सुकोसे कुटुंबियांवर हल्ला चढविला. हा हल्ला एवढा जबर होता की, सर्व जण गंभीर जखमी झाले. मधमाशांचा दंश असह्य झालेले सुकोसे कुटंबियांनी घटनास्थळावरून पळण्याचा प्रयत्न केला; परंतु मधमाशांनी त्यांचा पिच्छा सोडला नाही. यावेळी सुुनिल वर्तने हे सुकोसे कुटुंबियांच्या मदतीला धावले. जखमी झालेल्यांना तातडीने अकोट येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान लक्ष्मण सुकोसे यांचा मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या संतोष, रेखाबाई व पुजा यांना पुढील उपचारासाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.