शेतकऱ्याची गळफास घेउन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 17:20 IST2019-02-10T17:20:04+5:302019-02-10T17:20:21+5:30
मूर्तिजापूर : सततची नापीकी आणि वाढत्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून जांभा बु. येथील ५५ वर्षीय शेतकºयाने गळफास घेउन आत्महत्या केली.

शेतकऱ्याची गळफास घेउन आत्महत्या
मूर्तिजापूर : सततची नापीकी आणि वाढत्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून जांभा बु. येथील ५५ वर्षीय शेतकºयाने गळफास घेउन आत्महत्या केली. ही घटना १० फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता घडली. मधुकर नथ्थूजी भटकर असे मृतक शेतकºयाचे नाव आहे.
मधुकर भटकर यांच्याकडे सहा एकर कोरडवाहू शेती आहे. अलिकडेच त्यांनी आपल्या शेतात बोअर केले होते. त्यांनी शेती मशागत व इतर कामासाठी बँक बडोदाचे ९९ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. तसेच काही खासगी फायनान्सकडूनही त्यांनी कर्ज घेतले होते. त्यांना गेल्या काही दिवसांपासून शेतात अपेक्षीत उत्पन्न होत नव्हते. त्यामुळे, कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत रविवारी त्यांनी गावालगत असलेल्या एका शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास घेउन आत्महत्या केली. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सून व आप्त परिवार आहे. (तालुका प्रतिनिधी)