शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

बाजारभावापेक्षा सवलतीची तूर डाळ महाग !

By admin | Updated: August 23, 2016 01:16 IST

बाजार भावापेक्षा सरकारकडून सवलतीच्या दरात मिळणारी तूर डाळ महाग; ८ ते ३३ रुपयांची तफावत.

संतोष येलकर अकोला, दि. २२: सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत दारिद्रय रेषेखालील (बीपीएल) आणि अंत्योदय योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात प्रती १0३ रुपये किलो दराने तूर डाळ वितरित करण्यात येत आहे; मात्र बाजारात ७0 ते ९५ रुपये प्रती किलो दराने तूर डाळ विकली जात आहे. त्यामुळे बाजार भावापेक्षा सरकारकडून सवलतीच्या दरात मिळणारी तूर डाळ महाग ठरत असल्याने, जिल्ह्यातील गरीब शिधापत्रिकाधारक रास्त भाव दुकानातून ही डाळ कशी घेणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गत २१ जुलै रोजीच्या शासन निर्णयानुसार सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत राज्यातील बीपीएल शिधापत्रिकाधारक आणि अंत्योदय योजनेंतर्गत प्रतिमाह प्रत्येक शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात १२0 रुपये दराप्रमाणे एक किलो तूर डाळ वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर शासनाच्या ६ ऑगस्ट रोजीच्या परिपत्रकानुसार सवलतीच्या दरातील तूर डाळ १0३ प्रती किलो दराने वितरित करण्याचे निश्‍चित करण्यात आले.अकोला जिल्ह्यातील सातही तालुक्यात ९५ हजार ६९२ बीपीएल आणि अंत्योदय योजनेंतर्गत ४४ हजार ७८१ असे एकूण १ लाख ४0 हजार ४७३ शिधापत्रिकाधारक आहेत. शासन निर्णयानुसार या शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरातील तूर डाळीचा लाभ दिला जाणार आहे. जिल्ह्यातील लाभार्थी शिधापत्रिका धारकांना ऑगस्ट महिन्यात सवलतीच्या दरात तूर डाळीचे वितरण करण्यासाठी २ हजार ३९ क्विंटल तूर डाळीचा साठा २0 ऑगस्ट रोजी प्राप्त झाला. उपलब्ध झालेला तूर डाळीचा साठा जिल्ह्यातील रास्त भाव दुकानांना वितरित करण्याची प्रक्रिया जिल्हा पुरवठा विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे; परंतु सवलतीच्या दरात प्रती किलो १0३ रुपये दराने तूर डाळ वितरित केली जात असतानाच, बाजारात मात्र केवळ ७0 ते ९५ रुपये किलो दराने तूर डाळ विकली जात आहे. बाजारभावाच्या तुलनेत सरकारच्या सवलतीच्या दरातील तूर डाळ जादा दराने मिळत असल्याने, जिल्ह्यातील गरीब शिधापत्रिकाधारक लाभार्थी रास्त भाव दुकानांमधील सवलतीच्या दरातील तूर डाळ कशी घेणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.