शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

युवकांसह ज्येष्ठांनाही फॅन्सी नंबर प्लेटची क्रेझ

By admin | Updated: February 14, 2015 01:18 IST

फॅन्सी नंबर प्लेट वापरात राजकीय नेते व कार्यकर्तेही आघाडीवर.

अकोला : मोटारसायकल, कारची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. दुचाकी, चारचाकी वाहनांच्या संख्येसोबत वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट लावून घेण्याची क्रेझ प्रचंड वाढली. ह्यलोकमतह्णने शुक्रवारी शहरातील शंभर वाहनधारकांचे सर्वेक्षण करून त्यांचे फॅन्सी नंबर प्लेटबाबत मत जाणून घेतले. सर्वेक्षणादरम्यान शंभरपैकी ८६ वाहनधारकांनी फॅन्सी नंबर प्लेटला पसंती दर्शविल्याची गंभीर बाब समोर आली. रस्त्यांवरून धावणार्‍या गाड्यांना असलेले स्पेशल नंबर नेहमीच दिसून येतात. या स्पेशल नंबरवाल्या गाडीवर फिरणारी व्यक्तीही स्पेशलच असणार, असेही आपल्याला वाटते. स्पेशल नंबर घेऊन हे उँचे लोग, त्यांची उँची पसंद जोपासताना दिसतात. त्यासाठी वाहतूक नियम पायदळी तुडविली जातात. स्पेशल नंबर घेऊन त्याला फॅन्सी टच देणार्‍यांची संख्या अलीकडे भलतीच वाढली आहे. फॅन्सी नंबरप्लेटविषयी उच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले असतानाही, त्याकडे कानाडोळा करीत वाहनधारक नियमाप्रमाणे नंबर प्लेट तयार न करता, फॅन्सी नंबर प्लेट वाहनावर बसवितात. वाहतूक नियमांचा, कायद्याचा भंग होत असल्याचे माहीत असून, हजारो मोटारसायकलस्वार, कारमालक फॅन्सी नंबर प्लेट बसवितात. फॅन्सी नंबर प्लेटवर कायद्याने बंदी आणली, तरी त्याचा विशेष फरक पडणार नसल्याचे ५५ टक्के वाहनचालकांना वाटते. फॅन्सी नंबर प्लेट स्वत:हून काढण्याविषयी विचारले असता, वाहनचालकांनी, अनेकजण कायद्याचे उल्लंघन करतात. त्यांचेवर वाहतूक पोलीसही कारवाई करीत नाहीत. मग, आम्हीच का फॅन्सी नंबर प्लेट काढावी? असा प्रश्न केला. वाहतूक नियंत्रण शाखेने दंड वाढविल्यानंतर फॅन्सी नंबर प्लेट काढणार का? असा प्रश्न केल्यावर, वाहनचालकांनी दंड वाढविल्यानंतरही फारसा फरक पडणार नसल्याचे स्पष्ट केले.