शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
2
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
3
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
4
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
5
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
6
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
9
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
10
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
11
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
12
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
19
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
20
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बनावट गुंठेवारी प्रकरण; सहाय्यक नगर रचनाकारांचे बयाण

By admin | Updated: May 10, 2014 23:30 IST

प्रस्तावावरील स्वाक्षरी बनावट

अकोला : महापालिकेतील नगर रचना विभाग व उपविभागीय कार्यालयातून तयार करण्यात आलेल्या बनावट गुंठेवारी प्रस्तावप्रकरणी मनपाचे तत्कालीन प्रभारी सहाय्यक नगर रचनाकार आर.एन. साबळे यांचे बयाण शुक्रवारी रात्री सिटी कोतवाली पोलिसांनी नोंदवले. प्रस्तावावरील स्वाक्षरी बनावट असल्याची माहिती साबळे यांनी पोलिसांना दिली.
वाशिम बायपास परिसरातील शेत सर्व्हे नं.४२/१ मधील तीन एकर जागेचा गुंठेवारी प्रस्ताव बनावट असल्याची तक्रार भारिप-बमसंचे गटनेता गजानन गवई यांनी आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्याकडे केली होती. पूर्वाश्रमीच्या शेतमालक पुष्पाबाई वसंतराव औतकर तर्फे गोविंद शंकरलाल बजाज यांच्या नावाने गुंठेवारीचा प्रस्ताव मनपाच्या परवानगीशिवाय मंजूर झाल्याची धक्कादायक बाब उजेडात आली. सदर प्रस्ताव नगर रचना विभागाकडे सादर केल्यानंतर दुसरीकडे या प्रस्तावाला उपविभागीय अधिकारी कार्यालयातून मंजुरी मिळाल्याने दोन्ही शासकीय कार्यालयांची फसवणूक झाली. मनपाकडून हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला, त्या कालावधीत मनपाच्या नगर रचना विभागाचा प्रभार सहाय्यक नगर रचनाकार आर. एन. साबळे यांच्याकडे होता. प्रस्तावावर आर.एन. साबळे यांच्यादेखील स्वाक्षरी असल्याने यासंदर्भात प्रभारी सहाय्यक नगर रचनाकार साबळे यांच्यासह पूर्वाश्रमीच्या शेतमालक पुष्पाबाई औतकर यांना लेखी खुलासा सादर करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले होते. यावर तत्कालीन सहाय्यक नगर रचनाकार आर.एन. साबळे यांनी मंजूर प्रस्तावावरील त्यांच्या स्वाक्षरी बनावट असल्याचे मनपाकडे नमूद केले. या प्रकरणी मनपाकडून सिटी कोतवाली पोलिसात फौजदारी तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यामध्ये प्रस्तावावर मनपाचे तत्कालीन सहाय्यक नगर रचनाकार आर.एन.साबळे यांच्या स्वाक्षरी असल्याने त्यांचे बयाण नोंदवण्यात आले. यावेळी प्रस्तावावरील सर्व स्वाक्षरी बनावट असल्याची माहिती साबळे यांनी पोलिसांना दिली.