शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
2
Top Marathi News LIVE Updates: 'निवडणुका संपताच वसुली सुरू झालीये', दरवाढ होताच विरोधकांनी केंद्र सरकारला घेरले
3
Petrol Pump : आता प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? व्हायरल मेसेजवर PIB ने दिलं मोठं स्पष्टीकरण
4
Sangli: वादळामुळे ९ महिन्यांचे बाळ पाळण्यासह हवेत उडाले, खाली पडल्यानंतरही सुखरुप होते, पण... 
5
'अमेरिका संपत चाललाय!' जिनपिंग यांच्या विधानाने खळबळ; पण ट्रम्प म्हणतात, "ते बरोबरच बोलले!"
6
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
7
रजनीकांत यांच्या 'जेलर २'च्या सेटवर मोठी दुर्घटना, विजेचा झटका लागल्याने एका तरुणाचा मृत्यू
8
MI चा कॅप्टन झाल्यावर बुमराहनं सांगून PBKS चं प्लेऑफ्सचं गणित बिघडवलं; मग BCCI कडे केली खास डिमांड
9
धक्कादायक! पतीची मदत घेऊन प्रियकराचा काटा काढला, मृतदेह ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला
10
Numerology: तुमची जन्मतारीख सांगेल तुमची 'ती' एक सवय; ज्यामुळे लोक तुमच्यावर होतात नाराज!
11
Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट
12
पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी घरी बोलावलं, दारू पाजली अन्... मुंबईतील खळबळजनक घटना!
13
"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला
14
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
15
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
16
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
17
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
18
Maharashtra Farmer: सहा मोठ्या धरणांतील गाळ शेतकऱ्यांना देणार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय 
19
शनी जयंती २०२६: तुम्हाला माहीत आहे का? शनी जयंतीला पिंपळाखाली 'कणकेचाच दिवा' का लावतात?
20
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

जादा दरात अडकले धान्य वाहतुकीचे कंत्राट

By admin | Updated: May 26, 2014 01:13 IST

जादा दराच्या धान्य वाहतुकीच्या निविदांना शासनाकडून मंजुरी मिळणे प्रलंबित झाला आहे.

अकोला: सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत धान्य वाहतुकीच्या नवीन कंत्राटासाठी राज्यातील विविध जिल्ह्यात प्राप्त झालेल्या निविदांमध्ये आधारभूत दरांपेक्षा जादा दर प्राप्त झाले आहेत. जादा दराच्या या निविदांना शासनाकडून मंजुरी मिळणे प्रलंबित असल्याने राज्यात धान्य वाहतुकीचा पेच निर्माण झाला आहे. सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत शासनाच्या निर्णयानुसार, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अन्न धान्य वाहतुकीचे नवीन कंत्राट निश्‍चित करण्याचे आदेश देण्यात आले. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात तालुका स्तरावरील धान्य गोदामापर्यंत अन्न-धान्याची वाहतूक करण्यासाठी शासनामार्फत धान्य वाहतुकीचे टप्पानिहाय आधारभूत दर निश्‍चित करण्यात आले. त्यानुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात धान्य वाहतुकीच्या नवीन कंत्राटासाठी निविदा मागविण्यात आल्या; मात्र बहुतांश जिल्ह्यांमध्ये आधारभूत दरापेक्षा जादा दराने निविदा प्राप्त झाल्याने, या निविदा शासनाकडे मंजुरीसाठी दोन महिन्यांपूर्वी पाठविण्यात आल्या. त्याला अद्याप शासनामार्फत मंजुरी मिळाली नाही. परिणामी त्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यात जुन्या दराने धान्याची वाहतूक केली जात आहे. तर जुन्या दराने धान्याची वाहतूक करणे परवडत नसल्याने, कंत्राटदारांनी धान्याची वाहतूक बंद केल्याच्या स्थितीत, काही जिल्ह्यात धान्याचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. जादा दरात अडकलेल्या धान्य वाहतुकीच्या नवीन कंत्राटाचा गुंता गेल्या दोन महिन्यांपासून कायम असल्याने, शिधापत्रिकाधारकांना धान्याच्या लाभापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.