शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

‘आप’ची विधानसभा निवडणुकीतून एक्झिट

By admin | Updated: August 21, 2014 00:56 IST

नेते, कार्यकर्त्यांचा हिरमोड

अकोला: सहा महिन्यांपूर्वी देशाच्या राजकारणात हडकंप माजविणार्‍या आम आदमी पक्षाची लोकसभा निवडणुकीनंतर हवा गुल झाली आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये झालेल्या दारूण पराभवाची पुनरावृत्ती होवू नये, याकरिता राज्यातील विधानसभा निवडणुक न लढविण्याची घोषणा पक्षाने केली आहे. त्यामुळे अनेक स्वप्न उराशी बाळगून ह्यआपह्णमध्ये सामील झालेले नेते व कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे. दिल्ली विधानसभेत सत्ता प्राप्त केल्यानंतर आम आदमी पक्षाचा दबदबा देशात वाढला होता. काँग्रेस व भाजपासह तिसरा पक्ष म्हणून लोकसभा निवडणुकीत आप पक्षाला गणन्यात येत होते. त्यामुळे चालत्या नावेत बसणारे अनेक नेते व कार्यकर्ते ह्यआपह्णमध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे पक्षाचे सदस्य व नेत्यांचे आकडे अचानक फुगले. आपल्यालाही पद मिळेल, उमेदवारी मिळेल,) अशी अनेकांना अपेक्षा होती. तसेच विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले अन्य पक्षातील मातब्बर नेते पक्षात प्रवेश करतील व जिल्ह्यातील राजकारणात काही वेगळे चित्र निर्माण होण्याची शक्यता होती; मात्र पक्षाने केवळ दिल्लीतच लक्ष्य केंद्रित करण्याचे ठरविले असून, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक लढवायची नाही, अशी भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा राज्य कार्यकारिणीची होती. त्याकरिता त्यांनी केंद्र कार्यकारिणीसोबत बैठक घेऊन काही निवडक मतदारसंघात निवडणूक लढविण्याची इच्छाही व्यक्त केली. ज्या लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत आपच्या उमेदवाराला ४0 ते ५0 हजारांच्या वर मते मिळाली, त्या ठिकाणी दोन ते तीन विधानसभा लढविण्याचा विचार आपच्या राज्य कार्यकारिणीतील नेत्यांनी केंद्रीय कार्यकारिणीपुढे मांडला. यातही प्रामुख्याने शहरातील मतदारसंघांचाच समावेश होता. पक्षाच्यावतीने राज्यात सर्व्हेही करण्यात आला होता. त्यानुसार राज्यात ६0 ते ७0 जागांवर उमेदवार लढविण्याची तयारी दर्शविण्यात आली होती. केंद्र व राज्य कार्यकारिणीच्या बैठकीनंतर राज्यातील विधानसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पक्षात सामील झालेले कार्यकर्ते व नेत्यांचा हिरमोड झाला आहे. अकोला लोकसभा निवडणुकीत अजय हिंगणकर यांना आठ हजारांच्या वर मते मिळाली होती. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट चालल्याने सर्वच पक्षांचा धुव्वा उडाला तर भाजपचे उमेदवार मोठय़ा फरकाने विजयी झाले. अकोल्यातही भाजपचे संजय धोत्रे दोन लाखांच्यावर मतांनी विजयी झाले.