शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
3
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
4
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
5
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
6
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
7
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
8
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
9
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
10
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
11
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
12
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
13
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
14
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
15
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
16
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
17
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
18
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
19
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
20
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका

‘अनलॉक’मध्येही उद्योग-व्यवसायांवर ‘अवकळा’च!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2020 10:24 AM

‘अनलॉक’मध्येही उद्योग-व्यवसायांवर ‘अवकळा’ कायम असून, कामांची गती मंदावलेलीच आहे.

- संतोष येलकर

अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर ‘लॉकडाऊन’च्या कालावधीत उद्योग-व्यवसाय बंद पडल्याच्या स्थितीत गावी गेलेले जिल्ह्याबाहेरील आणि परप्रांतातील मजूर-कामगार अद्यापही जिल्ह्यात परतले नाही. त्यामुळे मजूर-कामगारांचा तुटवडा, प्रभावित झालेली कामे आणि उत्पादनाला कमी मागणी असल्याने, ‘अनलॉक’मध्येही उद्योग-व्यवसायांवर ‘अवकळा’ कायम असून, कामांची गती मंदावलेलीच आहे.कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी गत २३ मार्चपासून जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’मध्ये जिल्ह्यातील वेगवेगळ्या उद्योग आणि व्यवसायांत काम करणारे जिल्ह्याबाहेरील आणि परप्रांतातील ४ हजार ८४९ पेक्षा अधिक मजूर-कामगार आपआपल्या गावांकडे गेले होते. त्यापैकी ७० टक्के मजूर-कामगार अद्यापही जिल्ह्यात परतले नाही. कोरोना संकटाच्या काळाच्या मजूर परत येण्यास तयार नसल्याने, मजूर-कामगारांच्या तुटवड्याचा उद्योग-व्यवसायांच्या कामांवर परिणाम झाला आहे. तसेच उद्योगांमध्ये निर्मिती होणाऱ्या विविध उत्पादनाला कमी मागणी असल्याने उद्योगांची उलाढाल प्रभावित झाली आहे. बांधकाम व्यवसायात इमारतींची बांधकामे काही प्रमाणात सुरू झाली असली तरी, या व्यवसायांतर्गत येणारी विविध कामे अद्यापही ठप्पच आहेत. त्यामुळे ‘अनलॉक’मध्येही जिल्ह्यातील उद्योग-व्यवसायांची गती मंदावलेलीच असल्याने या क्षेत्रातील अवकळा कायम असल्याचे वास्तव आहे.‘या’ उद्योग-व्यवसायावर झाला परिणाम!कोरोना संकट काळात जिल्ह्यात दालमिल, मिनी दालमिल, व्हाइट कोल निर्मिती, आॅइल मिल, फेब्रिकेशन, सिमेंट, टाइल्स, कृषी अवजारे, टॅÑक्टर-ट्रॉली, थे्रशर, प्लास्टिक पॅकिंग, प्लास्टिक कॅन आदी उद्योगांसह बांधकाम व्यवसायातील इमारतींची बांधकामे, बोअरिंग, सेंट्रिंग, पेंटर, प्लंबिंग, इलेक्ट्रिशियन, पीओपी, सुतारकाम आदी व्यवसायांवर परिणाम झाला आहे.जिल्ह्यातून असे परतले परप्रांतीय मजूर!‘लॉकडाऊन’च्या कालावधीत जिल्ह्यातून ४ हजार ८४९ परप्रांतीय मजूर-कामगार आपआपल्या गावाकडे परतले. त्यामध्ये आंध्र प्रदेश-१०२, बिहार-७७१, छत्तीसगड-६८, गुजरात-४३, झारखंड-३११, कर्नाटक-८, केरळ -९, मध्य प्रदेश -११२६, नवी दिल्ली-५,ओरिसा-५७, पंजाब-८, राजस्थान -४१९, तामिळनाडू -२०, तेलंगणा -१३२, उत्तर प्रदेश -१२५०, उत्तराखंड -१६ व पश्चिम बंगालमधील ४८४ इत्यादी मजूर-कामगारांचा समावेश.

टॅग्स :AkolaअकोलाAkola MIDCअकोला औद्योगिक विकास महामंडळCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकLabourकामगार