शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचा-यांना पिटाळले; फोर-जीचे खोदकाम केले बंद

By admin | Updated: October 1, 2014 01:26 IST

अकोला जुने शहर पोलिस ठाण्यात तक्रार.

अकोला : मोबाईल कंपन्यांच्यावतीने होणारे खोदकाम बंद करण्याचा ठराव मनपाच्या सभागृहाने पारित केल्यावरदेखील फोर-जी सुविधेसाठी खोदकाम करणार्‍या मोबाईल कंपनीच्या कर्मचार्‍यांना पिटाळून लावण्यात आल्याची घटना मंगळवारी जुने शहरातील जय हिंद चौकात घडली. कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात जुने शहर पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली. यावेळी पोलिसांनी कंपनीच्या साहित्याला सील लावले.फोर-जी सुविधा उपलब्ध करण्याच्या नावाखाली शहरात खोदकाम करणार्‍या मोबाईल कंपन्या मनमानी करीत आहेत. कंपनीकडून खोदकाम होत असताना सिमेंट काँक्रिट रस्त्यासह जलवाहिन्यांची प्रचंड तोडफोड होत असल्याने कंपनीचे काम बंद करण्याचा ठराव मनपाच्या सर्वसाधारण सभेत २१ ऑगस्ट रोजी घेण्यात आला होता. या ठरावाकडे प्रशासनाने कानाडोळा करीत मोबाईल कंपन्यांना शहरात खोदकामाची सूट दिल्याचे चित्र समोर येत आहे. परिणामी सिमेंट रस्त्यांसह जलवाहिन्यांची तोडफोड केल्या जात आहे. भाजप, शिवसेना नगरसेवकांच्या सूचनेवरून तत्कालीन महापौर ज्योत्स्ना गवई यांनी काम बंद करण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्यावरही मोबाईल कंपन्यांची मनमानी सुरूच आहे. हा प्रकार मंगळवारी जय हिंद चौकात मराठा सेवा संघाचे पदाधिकारी सुधिर काहाकार यांच्या लक्षात आला. यावेळी कंपनीच्या कर्मचार्‍यांना हटकले असता, त्यांनी अरेरावी केली. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी कं पनीच्या कर्मचार्‍यांना अक्षरश: पिटाळून लावले. कंपनीच्या विरोधात सुधिर काहाकार यांनी जुने शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. यावेळी पोलिसांनी कंपनीच्या खोदकामाच्या मशीनला सील लावले.