शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
IPL 2026 : अभिषेक-हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
5
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
6
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
7
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
8
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
9
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
10
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
11
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
12
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
13
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
15
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
16
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
17
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
18
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
19
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
20
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात १३ कंत्राटदारांचा आत्मदहनाचा प्रयत्न

By admin | Updated: November 14, 2014 23:55 IST

मनपाच्या जलप्रदाय विभागाची देयके थकली.

अकोला: थकीत देयकांसाठी अकोला महापालिकेच्या १३ कंत्राटदारांनी आ त्मदहन करण्याचा प्रयत्न शुक्रवारी केला. जलप्रदाय विभागाची कामं करणारे हे कंत्राटदार २६ दिवसांपासून उपोषणास बसले आहेत. या कंत्राटदारांची सुमारे दीड कोटी रुपयांची देयके थकली आहेत. महानगरात पाणीपुरवठय़ाची समस्या दिवसेंदिवस जटील होत आहे. जलवाहिनी दुरुस्तीचा कंत्राटदार आणि मनपामध्ये झालेला करार १४ जुलै रोजी संपुष्टात आला. त्यानंतर मनपा प्रशासनाने ऑगस्ट महिन्यात जलवाहिनी दुरुस्तीची निविदा जारी केली. प्रशासनाने लेखी आदेश न देता, कंत्राटदारांना काम सुरू करण्यास सांगितले; मात्र १ कोटी ३५ लाखांचे थकीत देयक प्रशासनाने अदा करावे, त्यानं तरच कामास सुरुवात करू, असा पवित्रा कंत्राटदारांनी घेतला. त्यामुळे प्रशासनाने देयक अदा न करण्याचा निर्णय घेतला. परिणामी कंत्राटदारांनी बेमुदत उपोषण सुरू केले.दरम्यान, कंत्राटदारांनी मागण्या पूर्ण न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा ७ नोव्हेंबर रोजी आयुक्तांना निवेदनाद्वारे दिला होता. त्यानुसार मनपासमोर शुक्रवारी तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यावेळी उपोषणकर्ते कंत्राटदार प्लास्टिकच्या बाटलीमध्ये रॉकेल घेऊन मनपासमोर अचानक दाखल झाले. काहींनी रॉकेलची बाटली खिशात लपवून आणली होती. त्यामुळे पोलिस आणि मनपाच्या सुरक्षा रक्षकांना ही बाब उशिरापर्यंत समजली नाही. पोलिसांनी बाटली जप्त करेपर्यंत काही कंत्राटदारांनी अंगावर रॉकेल ओतले होते. अग्निशमन दलाने कंत्राटदारांच्या अंगावर लगेच पाणी ओतल्याने आत्मदहनाचा प्रयत्न फसला. पोलिस आणि मनपाच्या सुरक्षा रक्षकांनी आत्मदहनाचा प्रयत्न करणार्‍या १३ कंत्राटदारांना ताब्यात घेतले. *सौम्य लाठी हल्लाकंत्राटदार अचानकपणे अंगावर रॉकेल घेऊन मनपासमोर आले. त्यामुळे वाहनचालक आणि पादचार्‍यांची धावपळ उडाली. लगेच घटनास्थळी गर्दी झाली. जमाव पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठी हल्ला करावा लागला.*कंत्राटदारांवर प्रतिबंधात्मक कारवाईआत्मदहनाचा प्रयत्न करणार्‍या १३ कंत्राटदारांवर सिटी कोतवाली पोलिसांनी प्र ितबंधात्मक कारवाई केली. यामध्ये मुरलीधर प्रल्हाद सटाले, शेषराव तुळशीराम मोरे, सुशील नारायण तिवारी, किशोर सुखदेव कराळे, प्रशांत लक्ष्मण गजभिये, अब्दुल रज्जाक शाह, शेख रफिक शेख रसुल, पुरुषोत्तम किसनराव गुडवाले, विवेक वसंतराव वाहुरकर, विराज सुरेशचंद्र निचळ, अनिल रंगराव देशमुख, गजानन सूर्यभान सोनटक्के आणि अनिल हिरामण उपासे यांचा समावेश आहे.