शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
5
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
6
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
7
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
8
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
9
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
10
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
11
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
12
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
13
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
14
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
15
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
16
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
17
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
18
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
19
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
20
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
Daily Top 2Weekly Top 5

शेतीवर आधारित प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न

By admin | Updated: November 19, 2014 01:56 IST

लोकमत संवाद; आ. बळीराम सिरस्कार यांचे सुतोवाच .

अकोला : शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरीत होऊन काम करणार्‍या भारिप-बहुजन महासंघातर्फे विधानसभा निवडणूक लढविताना सलग दुसर्‍यांदा विजयी झालेले आमदार बळीराम सिरस्कार येणार्‍या काळात वीज निर्मिती प्रकल्पाचा प्रश्न सोडविण्यासोबतच सिंचन क्षमता वाढविणे आणि खारपाणपट्टय़ातील समस्या सोडविण्याला प्राधान्य देणार आहे. बेरोजगारांची प्रश्न गंभीर स्वरुप घेत असल्याने शेतीवर आधारीत प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी मतदारसंघात प्रयत्न करणार असल्याचे मत आ. सिरस्कार यांनी मंगळवारी लोकमतच्या संवाद कार्यक्रमात संपादकीय विभागातील सहका-यांसोबत चर्चा कताना व्यक्त केले. प्रश्न : लेमन सिटी म्हणून अकोल्याची ओळख आहे. ही ओळख निर्माण करण्यासाठी बाळापूर मतदारसंघाचा वाटा मोठा आहे. अलिकडच्या काळात मात्र लिंबू उत्पादनात घट होताना दिसत आहे. ते वाढविण्यासाठी काही उपाययोजना आहेत काय?आ. सिरस्कार: बाळापूर मतदासंघातील वाडेगाव परिसरात कांदा आणि लिंबू उत्पादन मोठय़ाप्रमाणावर होते. या पिकांवर आधारित प्रक्रिया उद्योग येथे उभे झाले तर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. याशिवाय सामुहिक शेतीचा प्रयोग राबविल्यास कांदा आणि लिंबू उत्पादक शेतकर्‍यांना त्यांच्या मालासाठी जागेवरच चांगल्या दर मिळू शकतील. बाळापूर मतदारसंघातील, विशेषत: बाळापूर शहरातीलच रस्ते व पुलांचा प्रश्न सोडविण्यासाठी कोणते प्रयत्न करणार आहात?आ. सिरस्कार: बाळापूर शहरातील रस्त्यांसाठी १.५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मोहरम उत्सवामुळे रस्त्याचे काम बंद होते. ते पुन्हा सुरू होत आहे. पुल, पुलांवरील कठड्यांसाठी पाठपुरावा सुरू असून काही कामांना नुकतीच मंजुरी मिळाली आहे. पुलाच्या प्रस्तावाला केंद्र शासनाकडून निधी मंजुर झाला आहे. निधी मिळातच काम सुरू होईल. रस्त्यांसोबतच स्मशान भूमीच्या समस्या सोडविण्यासही प्राधान्य दिले आहे. प्रश्न : हैदराबाद-इंदोर या नवीन राष्ट्रीय महामार्गाचे काम पातूर तालुक्यात रखडले आहे. ते सुरू करण्याच्या दृष्टीने काय प्रयत्न केलेत?आ. सिरस्कार: हे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे आहे. या मार्गाची निविदा प्रक्रिया सुरू आहे. नादेंड विभागातील काम सुरू आहे. जिल्ह्यातून जाणार्‍या मार्गाचे कामही लवकर सुरू करण्यासाठी पाठपुरावा करू.प्रश्न :ऐतिहासिक वारसा लाभलेले दोन तालुके मतदारसंघात आहेत. त्यादृष्टीने पर्यटन वाढीकरिता काय प्रयत्न करणार आहे?आ. सिरस्कार: मतदारसंघातील तिर्थक्षेत्रांचा दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न केले आहे. बाळापूरच्या किल्लयाचे वैभव टिकवून ठेवण्यासाठीही प्रयत्न झालेत. पर्यटन वाढीसाठी बाळापूर आणि पातूरमध्ये बराच वाव आहे. त्यासाठी काही प्रस्ताव तयार करून ते शासनाकडे पाठवू. प्रश्न - वाडेगाव परिसरातील लिंबाने भारतीय बाजारपेठेत नावलौकिक प्राप्त केला आहे; परंतु लिंबावर आधारित प्रकिया उद्योग व लिंबाचे क्षेत्र घटले आहे. यासंबधी आपण काय करणार?आ. सिरस्कार: हा अत्यंत जिव्हाळ्य़ाचा प्रश्न असून, या भागातील लिंबू उत्पादनाचे क्षेत्र वाढलेच पाहिजे आणि त्यावर आधारित प्रक्रिया उद्योग उभा झालाच पाहिजे, या मताचे आपण आहोत. या प्रश्नावर लक्ष देणार आहे. शेतमालावर आधारित प्रक्रिया उद्योगांची उभारणी करणे ही काळाची गरज आहे. प्रश्न :- भारिप-बमसंला सर्वच समाजाची मतं का मिळत नाहीत?आ. सिरस्कार :- प्रत्येक समाजघटकाला निवडणुकीत संधी देणे हे भारिप-बमसंचे धोरण आहे. भारिप-बमसंला इतर समाजातील मतं कमी प्रमाणात मिळतात. इतर समाजातील जास्त मतं न मिळण्यासाठी अनेक कारणं आहेत. प्रश्न :- विकासकामांच्या देखभाल, दुरुस्तीकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी प्रयत्न करणार काय ?आ. शिरस्कार :- दिंडी मार्गातील पथदिवे फोडले जातात. ही संपत्ती आपली स्वत:ची आहे, अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण होणे आवश्यक आहे. लोकसहभागातूनच देखभाल शक्य आहे.