शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन नोंदणीचा ठिंबकच्या अनुदानात खोडा

By admin | Updated: December 25, 2014 01:01 IST

वितरकांनी फिरविली पाठ: शेतकरी मेटाकुटीस

वाशिम- राज्यातील शेतकरी आत्महत्यांना लगाम घालण्याचा डांगोरा पिटणार्‍या शासनाचे शेतकरी प्रेम चक्क बेगडी असून ठिंबक सिंचन योजनेतील जाचक अटींनी ही बाब अधोरेखित केली आहे. ठिंबक सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍यांना बंधनकारक केलेली ऑनलाईन नोंदणी, नोंदणीकृत वितरकांकडूनच ठिंबक संच खरेदी अश्या जाचक अटींमुळे शेतकरी मेटाकुटीस आल्याचे चित्र राज्यभरात दिसून येत आहे.सद्या राज्यात पावसाळ्याचे दिवस कमी झाले आहेत. परिणामी, भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली असून याचा परिणाम सिंचनावर झाला आहे. सिंचनाअभावी उत्पन्नात घट झाल्यामुळे शेतकरी कर्जवाजारी होत असल्याने यातूनच आत्महत्यांचे सत्र वाढले आहे. आत्महत्यांना आळा घालण्यासाठी प्रयत्नरत असलेल्या शासनाचा शेतकर्‍यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिसून येत आहे. तुषार सिंचन, ठिंबक सिंचन आदी महत्वाच्या योजना याचाच एक भाग आहेत. या योजनांसाठी शेतकर्‍यांना शासन अनुदान देते. मात्र, योजनेच्या अंमलबजावणीत शासनाने धरसोडपणाचे धोरण अवलंबल्यामुळे त्याचा फटका शेतकर्‍यांना बसत आहे. राज्याला प्रत्येक दोन वर्षांनी दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. त्यावेळी पिण्याच्या पाण्याची स्थिती अतिशय हलाखीची असते. शेतीच्या पाण्याचा तर विचारच न केलेला बरा. या काळात शेतकर्‍यांसाठी ठिबक सिंचन योजना संजीवनी ठरते. १९९0 सालापासून सुरू झालेल्या या योजनेसाठी केंद्र व राज्य सरकार अनुदान देते. ठिबकमुळे पाण्याच्या बचतीबरोबरच उत्पादनही मोठय़ा प्रमाणात वाढते. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकर्‍यांचा कल ठिबक संच बसवण्याकडे वाढतो आहे. ठिबकच्या अनुदानासंबंधी अनेक प्रकारचे निकष शासनाने निर्धारित केलेले आहे. ते निकष आजमितीला कालबाह्य झाले आहेत. ठिबकसाठीचे प्रस्ताव ऑनलाईन करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला असला तरी, संकेतस्थळ वारंवार बंद राहत असल्यामुळे बहुतांश शेतकर्‍यांना या योजनेपासून वंचीत रहावे लागत आहे.