शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
5
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
6
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
7
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
8
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
9
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
10
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
11
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळेच मराठी भाषा अभिजात दर्जापासून वंचित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 1:28 AM

अकोला : कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. मराठी भाषा ही चिरंतन आहे; परंतु अलीकडच्या काळात मराठी भाषेच्या संवर्धनाचा मुद्दा उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देमराठी राजभाषा दिन अकोल्यातील साहित्यिक, कवींची खंत

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. मराठी भाषा ही चिरंतन आहे; परंतु अलीकडच्या काळात मराठी भाषेच्या संवर्धनाचा मुद्दा उपस्थित होत आहे. मराठी ही मातृभाषा असून, ती मागे का पडत आहे? मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे; परंतु राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळेच मराठी भाषेला आतापर्यंत अभिजात दर्जा मिळू शकला नसल्याची खंत अकोल्यातील ज्येष्ठ साहित्यिक, कवींनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. पंधरा वर्षांपूर्वी केंद्र सरकारने सर्वप्रथम तमिळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. पुढे संस्कृत, तेलुगु, कन्नड, मल्याळम आणि ओडिया यांनीही हा दर्जा मिळवला. उच्च कुलीन या अर्थाने  प्रचलित असलेल्या अभिजात या शब्दाला पुढे प्रबोधनकाळात श्रेष्ठ दर्जाचा असा अर्थ प्राप्त झाला. केंद्र सरकारने कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी प्रामुख्याने श्रेष्ठता हाच निकष लावलेला आहे. प्राचीनता, श्रेष्ठता, स्वयंभूपणा आणि सलगता हे या दजार्साठीचे चार निकष आहेत. मराठी भाषा हे चारही निकष पूर्ण करीत असूनही तिला अभिजात दर्जा मिळण्यासाठी झगडावे लागत आहे.  बोलीभाषांची विविधता हे मराठीचे खरे वैभव असून, त्याचा आपण अभिमान बाळगला पाहिजे. मराठीला ५२ बोलीभाषा आहेत. जिला जास्त ओढे ती नदी मोठी..याच न्यायाने मराठीला रसद पुरवणार्‍या या सर्व बोली महत्त्वाच्या आहेत. या सर्वच बोलीभाषांतील साहित्य खूप सकस आहे. बहिणाबाई, उद्धव शेळके, भुजंग मेश्राम, सदानंद देशमुख, रंगनाथ पठारे, व्यंकटेश माडगूळकर, लक्ष्मण गायकवाड, लक्ष्मण माने, राम नगरकर, आनंद विंगकर, राजन गवस, मच्चींद्र कांबळी, प्र. ई. सोनकांबळे, बा. भ. बोरकर, नामदेव ढसाळ या सार्‍यांमुळेच मराठी समृद्ध झालेली आहे. दलित साहित्याने मराठीला सामाजिक दस्तऐवज देऊन तिला श्रीमंत केले. असे असतानाही मराठी भाषेला श्रेष्ठत्व प्राप्त करण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. असे सांगत, साहित्यिक, कवींनी मराठीला अभिजात दर्जा न मिळण्यामागे राजकीय इच्छाशक्तीचा प्रचंड अभाव असल्याची खंत व्यक्त केली आहे. 

कितीही मराठी साहित्य संमेलने झाली, ठराव झाले. याला महत्त्व नाही. मुळात मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, असे राजकीय नेत्यांनाच वाटत नाही. त्यांच्या दृष्टीने मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा. हा मुद्दाच गौण आहे. दिल्लीत बसलेल्या सत्ताधार्‍यांसमोर आपल्या नेत्यांमध्ये मराठी भाषेचा आवाज उंचावण्याची क्षमताच नाही. एक विसंगती आहे. एकीकडे राज्य शासन मराठी शाळा बंद करीत आहे. मराठी भाषेविषयीची अनास्था असल्याने, अभिजात दर्जा मिळेल तरी कसा?- प्रा. नारायण कुळकर्णी कवठेकर, प्रसिद्ध कवी

मराठीला अभिजात दर्जा देण्याविषयी दरवर्षी चर्चा होते. मराठी दिन साजरा होतो; परंतु आम्ही मराठी भाषेला अशुद्ध करून ठेवले आहे. अनेक भाषांमधील शब्दांची रसमिसळ केली आहे. बोलताना, लिहिताना, व्याकरणाच्या दृष्टीने मराठीला शुद्ध करण्याचा प्रयत्न करतो का? संत ज्ञानेश्‍वर, संत तुकारामांचे अभंग शुद्ध मराठीत आहेत. त्यातील शब्द, स्वर मनाला आनंदित करणारे आहेत. मराठीला अभिजात दर्जा मिळण्यापेक्षा तिच्यातील समृद्धी, शुद्धता टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. - श्रीकांत कोराóो, साहित्यिक, कवी

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी पूर्वीच्या तुलनेत अधिक जोरकसपणे प्रयत्न सुरू आहेत. अनेक वर्षांची मागणी पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. मराठी ही श्रेष्ठ आहे. सध्या मराठी भाषेमध्ये इतर भाषेचेसुद्धा शब्द सामावले आहेत. जी भाषा इतर भाषेतील शब्दांना आपल्यात सामावून घेते, तीच भाषा जिवंत राहते. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासोबतच तरुण पिढीला वाचनाकडे वळविण्याची गरज आहे. - सीमा रोठे (शेट्ये), कार्याध्यक्षविदर्भ साहित्य संघ, अकोला शाखा

मराठी माणसाची केंद्र शासन नेहमीच अवहेलना करते.  मराठी ज्ञानभाषा झाली पाहिजे, यासाठी केवळ तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी प्रयत्न केले होते; परंतु त्यानंतर एकाही नेत्याने पुढाकार घेतला नाही. मराठीला अभिजात दर्जा मिळण्यापेक्षा मराठी भाषा व शाळांचा दर्जा, त्यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्याची गरज आहे. मराठी ही संतांच्या करुणेची आणि प्रबोधनकारांच्या क्रांतीची भाषा आहे. - श्रीकांत तिडके, माजी सदस्य भाषा सल्लागार समिती, महाराष्ट्र शासन

आपण नीट मराठीच बोलत नाही. मराठी भाषेविषयी आपल्याला किती आस्था आहे, हे आधी तपासून बघायला हवे. सध्या मराठी भाषेच्या मूळ पायालाच आम्ही धक्का पोहोचवतो आहे आणि दुसरीकडे  अभिजात दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करतो. नुसता दर्जा मिळूनही काहीच होणार नाही. - डॉ. विमल भालेराव, माजी प्राचार्यसीताबाई कला महाविद्यालय 

टॅग्स :AkolaअकोलाMarathi Language Day 2018मराठी भाषा दिन 2018