हुंडा दिला नाही म्हणून विवाहितेचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2017 03:14 IST2017-07-17T03:14:29+5:302017-07-17T03:14:29+5:30

अकोला : लग्नामध्ये हुंडा दिला नाही म्हणून विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करणाऱ्या पतीसह पाच जणांविरुद्ध अकोट फैल पोलिसांनी रविवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला.

Due to the dowry as a marital affair | हुंडा दिला नाही म्हणून विवाहितेचा छळ

हुंडा दिला नाही म्हणून विवाहितेचा छळ

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : लग्नामध्ये हुंडा दिला नाही म्हणून आता घरी पाण्याची बोअर करण्यासाठी आणि व्यवसायासाठी माहेराहून पैसे आणण्याचा तगादा लावून विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करणाऱ्या पतीसह पाच जणांविरुद्ध अकोट फैल पोलिसांनी रविवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला.
खरपमधील पंचशील नगरात राहणारी पायल जितेश सिरसाट (१९) हिने दिलेल्या तक्रारीनुसार, तिचा पती जितेश सिरसाट, सासू कोकिळा रामेश्वर सिरसाट, सासरे, रामेश्वर गणपत, दीर नीतेश व सागर (रा. भोड) हे तुझ्या वडिलांनी लग्नामध्ये हुंडा कमी दिला. त्यामुळे तू आता माहेराहून घरी बोअर करण्यासाठी आणि व्यवसायासाठी पैसे घेऊन ये, असा तगादा लावत; परंतु पायलने त्यांची मागणी पूर्ण न केल्यामुळे सासरच्या मंडळींनी तिला अश्लील शिवीगाळ, मारहाण करून घरातून काढून दिले. त्यामुळे पायलने महिला तक्रार निवारण कक्षाकडे तक्रार केली. महिला तक्रार निवारण कक्षाने याप्रकरणी चौकशी करून दोघांमध्ये तडजोड करण्याचा प्रयत्न केला. अखेर अकोट फैल पोलिसांनी पतीसह पाच जणांविरुद्ध भादंवि कलम ४९८ (अ), ३२३, ५०४, ५०६ (३४) नुसार गुन्हा दाखल केला.

Web Title: Due to the dowry as a marital affair